शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

 नागपुरात  अर्जाच्या जाळ्यात फसली स्वस्त घरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:29 IST

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकडे सोपविली. या दरम्यान नासुप्रने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बयाण जारी करून आर्थिकरीत्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्दे नासुप्रसतर्फे पुन्हा ऑनलाईन अर्जाचा पर्याय : मनपामध्ये ९४ हजार लोकांचे अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकडे सोपविली. या दरम्यान नासुप्रने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बयाण जारी करून आर्थिकरीत्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) श्रेणीमध्ये येणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे.ज्या लोकांनी मनपाकडे अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांना कोण घर उपलब्ध करून देणार, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.प्राधिकरणानेअर्जांची नियमावली तयार केली आहे. त्या आधारावर अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करणाऱ्यांना पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि स्वत:च्या बँक खात्यााचा कॅन्सल चेक द्यावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया शुरू झाल्यानंतर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्के घर नसल्याचे शपथपत्र द्यावे लागेल. सोबतच १० हजार रुपये अनामत रक्कम ५६० लाभार्थ्यांना द्यावी लागेल.स्कीमचे काम प्रगतिपथावर९ डिसेंबर २०१५ मध्ये सरकारने स्वस्त घराची योजना आणली होती. याकरिता मनपाने डिमांड मागवून सर्व्हेक्षण केले होते. डिसेंबर २०१८ पर्यंत मनपा पोर्टलवर ४१४७८ नागरिकांनी अर्ज केले तर सरकारच्या पोर्टलवर ५२८५८ अर्ज आले. त्या आधारावर वर्ष २०१७-१८ मध्ये एकूण १०७०४ घरकुल बनविण्याच्या योजनेवर नासुप्रने काम सुरू केले. सध्या नासुप्रतर्फे वाठोडा येथे २६४, तरोडीखुर्द ३३१६, वांजरी येथे ७६५ आणि वाठोडा येथे ४४८ फ्लॅट स्कीमचे काम सुरू आहे. नासुप्रची भविष्यात २५ हजार फ्लॅट बनविण्याची योजना आहे.२० हजार लोकांची यादी नासुप्रला सोपविली : मनपामनपाचे कार्यकारी अभियंता (एसआरए) राजेंद्र राहाटे यांनी सांगितले की, तपासणीनंतर २० हजार लोकांची यादी नासुप्रकडे सोपविली आहे. जर नासुप्रने वेगळी यादी मागविली असेल तर त्याची माहिती नाही. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांना ड्रॉद्वारे स्वस्त घर मिळणार आहे.अर्जासोबत पुन्हा शुल्क द्यावे लागेल : नासुप्रनासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार म्हणाले, अर्ज करणाऱ्यांना पुन्हा शुल्क भरावे लागेल. नियमावली तयार केली असून घर नसल्याचे शपथपत्र द्यावे लागेल.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका