शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात ‘केबल ड्रम’ चोरणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:32 IST

सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली.

ठळक मुद्देलोडिंग ट्रक, क्रेनसह कारने येऊन करायचे चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. संदीप विक्टर लाल (४०) रा. छिंदवाडा, जामई, मो. आरिफ अन्सारी आणि लियाकत अली ऊर्फ सद्दाम अफजल अन्सारी (२८) रा. ताजनगर टेका अशी आरोपीची नावे आहे.सदर येथील स्मृती टॉकीजसमोर फूटपाथवर ९ मार्च रोजी ५ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ११ केव्हीचे आर्म्ड केबलचा ड्रम चोरीला गेला होता. फिर्यादी रोशन ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदरचे एपीआय अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वातील डीबी चमूने या प्रकरणाचा शोध घेत असताना स्मृती टॉकीज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले. तेव्हा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता क्रेनच्या मदतीने ेएका ट्रकमध्ये केबल ड्रम ठेवले जात असल्याचे आढळून आले. यानंतर संबंधित ट्रक लेडीज क्लबजवळ दिसून आला. ट्रक क्रमांकाच्या आधारावर पोलीस एमआयडीसी परिसरात ट्रक व क्रेन भाड्याने देणारे व्यावसायिक विनोद यांच्यापर्यंत पोहोचले. व्यापारी विनोद यांनी जतीन वर्मा नावाच्या एका इंजिनियरला मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी कार, ट्रक व क्रेन भाड्याने दिल्याचे सांगितले. यानंतर ट्रक चालकाला विचारपूस केली असता केबलचे ड्रम ताजनगर टेका येथील कबाडी व्यापरी राशिद ऊर्फ मोनू अहमद नसीमुद्दीन मलीक (२७) याच्या गोदामात उतरविल्याचे सांगितले. कबाडी व्यापाऱ्याने केबल आरोपीकडून खरेदी केल्याचे सांगितले.- बॉक्स..क्रेनसह ४८ लाखाचे साहित्य जप्तपोलिसांनी छिंदवाडा येथील आरोपी संदीप लाल आणि मो. आरीफला २२ मार्चला अटक केली. यानंतर पाचपावली ताजनगर येथील लियाकत अलीला अटक करण्यात आली. आरोपींनी सदर शिवाय गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरातूनही केबल व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून केबल, रबरचे ट्यूब, इलेक्ट्रिक कटर, आणि ग्लँडर मशीन, मोबाईल, क्रेन (क्र. एमएच/३१/सीव्ही/५५२५), दहा चाकी ट्रक (एमएच/४०/३०७८) कार (एमपी/२८/सीए/६८९५)सह अ‍ॅल्युमिनिअम तार आदी ४८ लाखापेक्षा अधिक किमतीचे साहित्य जप्त केले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक