शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दृष्टिहीनांनी केली फलंदाजी अन गोलंदाजीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:28 IST

पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींनी फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल करीत हा सामना चांगलाच गाजवला. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीमच्या कर्मचाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून या मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.

ठळक मुद्देआत्मदीपम सोसायटीचा उपक्रम : पर्सिस्टंटच्या कर्मचाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून खेळले क्रिकेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्सिस्टंटजवळ नेल्को सोसायटीच्या मैदानावर शनिवारी अनोखा क्रिकेट सामना रंगला. डोळ्यांशिवाय आपण क्रिकेट खेळण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र डोळ्यात अंधाराशिवाय काहीच नसलेले खेळाडू या सामन्यात खेळत होते. होय, आत्मदीपम सोसायटीच्या दृष्टिहीन मुला-मुलींनी फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल करीत हा सामना चांगलाच गाजवला. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्सिस्टंट सिस्टीमच्या कर्मचाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून या मुलांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला.डोळ्यात अंधार असला तरी अंतर्मनात असलेला प्रकाश कोणताही आनंद घेण्यासाठी पुरेसा असतो. खेळांच्या माध्यमातून हा आनंद प्रवाहित होत असतो आणि त्यासाठी मग दृष्टीची कमतरता काहीही करण्यापासून रोखू शकत नाही. क्रिकेटच्या सामन्यात ही मुले ही गोष्ट अधोरेखित करीत होते. अर्थातच यामागे दिशा देणारी प्रेरणा महत्त्वाची असते आणि या मुलांसाठी प्रेरणा आहेत आत्मदीपम सोसायटीच्या संचालिका जिज्ञासा चवलढाल. जिज्ञासा स्वत: दृष्टीबाधित आहेत. मात्र त्यांनी संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीनांसाठी प्रकाशाची वाट निर्माण केली आहे. डोळस नसलेल्यांना सक्षम करण्यासाठी त्यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी क्रिकेटचा सामना हाही एक भाग आहे. त्यांनी आत्मदीपम विदर्भ असोसिएशन ऑफ ब्लाईंड क्रिकेटअंतर्गत एक टीमच तयार केली असून या टीमचे खेळाडू दृष्टिहीनांसाठी होणाऱ्या क्रि केट स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे हा क्रिकेट सामना असून यात पर्सिस्टंट सिस्टीम महत्त्वाची भूमिका बजावत आहे व हे दुसरे वर्ष आहे. पर्सिस्टंटचे समीर बेंद्रे यांच्या पुढाकाराने हे आयोजन केले जात आहे.या सामन्यात आत्मदीपमचे १८ खेळाडू आणि पर्सिस्टंटचे २० कर्मचारी डोळ्यावर पट्टी बांधून सहभागी झाले होते. प्रसंगी पट्टी बांधलेल्या कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागत होता, पण विदर्भाच्या ब्लाईंड टीमचे खेळाडू शिताफीने हा खेळ खेळत होते. फलंदाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण आणि स्टम्पच्या मागे असलेल्या खेळाडूंचे कौशल्य थक्क करणारे होते. ही मुले चौकार आणि षटकार मारण्यातही पटाईत असल्याचे जाणवले. प्रत्येक हालचालींवर ‘चीअरअप’ करणाऱ्या टाळ्या व आरोळ्या खेळाचा उत्साह आणखीनच वाढवित होत्या. अर्थातच हा सामना विदर्भ दृष्टिहीन संघानेच जिंकला हे विशेष.

 

टॅग्स :nagpurनागपूर