शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कामगार रोज स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर, सुरक्षा वाऱ्यावर! कंपनीच्या दुर्लक्षामुळे गेले जीव, कुटुंबीयांचा आरोप

By योगेश पांडे | Updated: June 15, 2024 10:50 IST

Nagpur Blast News: धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो स्फोटके व वातींमध्ये कामगार काम करत असतानाही सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट व परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली नव्हतीच, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही नसल्याचे समोर आले.

- योगेश पांडेनागपूर - धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लि. या कंपनीत स्फोट झाल्याच्या कारणांचा अद्यापही शोधच घेण्यात येत आहे. येथे पाचशे किलो स्फोटके व वातींमध्ये कामगार काम करत असतानाही सुरक्षेबाबत कंपनीकडून हव्या तशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. पॅकेजिंग युनिट व परिसरात आवश्यक सुरक्षा प्रणाली नव्हतीच, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणाही नसल्याचे समोर आले. मृतांच्या कुटुंबियांकडूनदेखील हा आरोप करण्यात आला आहे.

'लोकमत'ने यासंदर्भात कंपनीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्यूजेस व मायक्रोकॉर्ड बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येत असल्याने येथे ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात होते. मशीनने सेफ्टी फ्यूजेस व मायक्रोकॉर्ड तयार झाल्यावर महिलांकडून पॅकेजिंग करण्यात यायचे. मात्र कंपनीकडून कामगारांना आवश्यक सुरक्षा प्रणाली पुरविण्यात आली नव्हती. तसेच अग्निशमन यंत्रणादेखील हवी तशी नव्हती. त्यामुळेच स्पार्किंग झाल्यावर लगेच तेथे मोठा स्फोट झाला.

परिसरात एकहीरुग्णवाहिका नव्हतीमृत मशीन ऑपरेटर पन्नालाल बंदेवार यांचा मुलगा अनुरागनेही कंपनीकडून दुर्लक्ष झाल्याचा दावा केला. स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर सर्व लोक काम करत असताना परिसरात साधी रुग्णवाहिकाही तैनात नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे.कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर तणाव : मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाईच्या मागणीवरून दिवसभर कंपनीसमोर तणावाचे वातावरण होते. प्रवेशद्वारासमोरच मृतदेह आणून तेथे आंदोलन करण्यात आले.

आणखी एक मृत्यू, ३५ लाखाच्या मदतीची ग्वाहीजखमींपैकी शुक्रवारी दानसा मरसकोल्हे (२६, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या सात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करुन नातेवाइकांना कंपनीकडून प्रत्येकी २५ लाख, राज्य सरकारकडून १० लाख, असे ३५ लाखाची मदत देण्याची ग्वाही दिली. आरोपींना अटक अन् जामीन पोलिसांनी कंपनीचा संचालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोट