शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:39 IST

राज्यात माहितीचा अधिकार लागू झाल्यापासून राज्यातील विविध खंडपीठांचा कारभार संथ असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत होते. मात्र माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाचा वेग जास्त आहे.

ठळक मुद्देतक्रार निपटाऱ्याचे प्रमाण वाढीसमुख्यालय व बृहन्मुंबईनंतर नागपुरातच कमी प्रलंबित प्रकरणे

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात माहितीचा अधिकार लागू झाल्यापासून नागरिकांमध्ये याबाबत जागरुकता वाढते आहे. राज्यातील विविध खंडपीठांचा कारभार संथ असल्याने प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत होते. मात्र त्या तुलनेत माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाचा वेग जास्त आहे. द्वितीय अपिल व तक्रारींची संख्या यांच्यासोबतच प्रकरण निकाली काढण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आॅगस्ट अखेरीस मुख्यालय व बृहन्मुंबई खंडपीठानंतर सर्वात कमी प्रलंबित प्रकरणे नागपूर खंडपीठाकडे होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.डिसेंबर २०१६ पर्यंत नागपूर खंडपीठातील तक्रारी निपटाºयाचा वेग अतिशय संथ होता. खंडपीठाचा कारभार प्रभारी आयुक्तांच्या देखरेखीखाली सुरू होता. जानेवारी २०१७ ला नागपूर खंडपीठात राज्य माहिती आयुक्त म्हणून दिलीप धारुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निपटाऱ्याचे प्रमाण वाढीस लागले.जानेवारी २०१८ मध्ये खंडपीठाकडे ५२ तक्रारी प्रलंबित होत्या. मात्र त्यानंतर तक्रारी येण्याचा वेग वाढला. आॅगस्ट २०१८ पर्यंत ६४६ तक्रारी दाखल झाल्या. यापैकी ३५३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. आॅगस्ट अखेर प्रलंबित तक्रारींची संख्या ३४६ इतकी होती. २०१७ साली जुलै महिन्यात हाच आकडा १५४५ इतका होता.

केवळ ६५७ अपिल प्रलंबितद्वितीय अपिले व तक्रारींची प्रकरणे निकाली काढण्याचा वेग वाढला आहे. जुलै २०१७ मध्ये द्वितीय अपिलांची संख्या १५४५ इतकी होती. डिसेंबर २०१७ अखेरीस हा आकडा ९०३ इतका होता. त्यानंतरच्या आठ महिन्यात दाखल तक्रारींचे प्रमाण वाढले. जानेवारी ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत २५१३ द्वितीय अपिलं दाखल झाली. या कालावधीत २४०६ अपील निकाली काढण्यात आली. आॅगस्ट २०१८ अखेरीस नागपूर खंडपीठात ६५७ अपीलं प्रलंबित होती. द्वितीय अपिलांच्या निपटाऱ्यात बृहन्मुंबई खंडपीठानंतर नागपूर खंडपीठाचाच क्रमांक लागत आहे.

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकार