लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीक मागणाऱ्या दोघांमध्ये पैशाच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास हसनबाग चौकाजवळ ही घटना घडली.भुरू असे जखमीचे नाव असून आरोपीचे नाव वकील आहे. भुरू आणि वकील हे दोघे हसनबाग परिसरात भीक मागतात. रात्री रस्त्यालगत जेथे जागा मिळाली तेथे झोपतात. रविवारी दिवसभर भीक मागून ते हसनबाग चौकाजवळ बसले. दिवसभर गोळा केलेल्या पैशावरून त्यांच्यात उशिरा रात्री वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांना शिवीगाळ करीत होते. सोमवारी पहाटे २ वाजता त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वकीलने बाजूची वीट उचलून भुरूच्या डोक्यात घातली. त्यामुळे भुरू गंभीर जखमी झाला. त्यांचे भांडण आणि आरडाओरड ऐकून इजाज इजराईल शेटे (वय ३४, रा. हसनबाग) यांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वकीलविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी भुरूवर उपचार सुरू आहेत.
नागपुरात भिक्षेकऱ्यात पैशावरून हाणामारी , एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 20:38 IST
भीक मागणाऱ्या दोघांमध्ये पैशाच्या वादातून जोरदार हाणामारी झाली. यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे २ च्या सुमारास हसनबाग चौकाजवळ ही घटना घडली.
नागपुरात भिक्षेकऱ्यात पैशावरून हाणामारी , एक गंभीर जखमी
ठळक मुद्देनंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल