शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अपार्टमेंट व हॉटेल्सना कचरा प्रक्रियेची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:10 IST

अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे.

ठळक मुद्देमहापालिका ओला कचरा उचलणार नाही अपार्टमेंटने शोधावी जागा१७ डिसेंबरपासून अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपार्टमेंट व मोठ्या हॉटेल्सना ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावयाची आहे. शहरात ९७७ मोठे अपार्टमेंट तर ४५ मोठे हॉटेल्स आहेत. या सर्वांना कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावयाची आहे. यासाठी सक्ती करण्यात आली आहे. महापालिके च्या आरोग्य विभागाचे कर्मचारी हा कचरा उचलणार नाही. फक्त सुका कचरा उचलतील. १७ डिसेंबरपासून या निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे.शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने हा पर्याय स्वीकारला आहे. नागपूर शहरात दररोज १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. शहरातील संपूर्ण कचरा भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे साठविला जातो. परंतु कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने तो साठवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हॉटेल्स, डम्पिंगयार्ड यांना कचऱ्यावर प्रक्रिया करावयाची आहे. त्यानुसार यापुढे महापालिकेचे कर्मचारी तेथील ओला कचरा उचलणार नाही किंवा त्या परिसरात कचरा संकलित करणाऱ्या गाड्या जाणार नाहीत. शहरातील काही अपार्टमेंटने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली आहे. शहरातून जमा होणारा १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. परंतु यातील जेमतेम १०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

१०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्यांना बंधनशहरात अपार्टमेंटची संख्या मोठी असली तरी दररोज १०० किलोहून अधिक कचरा निघणारे अपार्टमेंट, मोठे हॉटेल्स यांनाच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. यासाठी अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करणे अपेक्षित आहे. अशा अपार्टमेंटमधील फक्त सुका कचरा महापालिकेची कर्मचारी उचलतील.व्यवस्था करण्याची जबाबदारी अपार्टमेंटचीबहुसंख्य अपार्टमेंटमध्ये सुका कचरा संकलित करून त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही. जागा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु जागा अपार्टमेंटनीच शोधायची आहे. ही त्यांची जबाबदारी आहे. ही बाब अशक्य नाही, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.जागाच नसेल तर सक्ती नाहीशहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करावा, ज्या अपार्टमेंट, सोसायट्या वा हॉटेल्स मधून दररोज १०० किलो कचरा निघतो. त्यांनी ओला कचऱ्यावर प्रक्रिया करावयाची आहे. यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करावी. मात्र एखाद्या अपार्टमेंटमध्ये जागाच नसेल तर तपासणी करून सक्ती केली जाणार नाही.- डॉ. सुनील कांबळे,आरोग्य अधिकारी, महापालिका

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका