लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. ६ई ६८९७/६२६९ बेंगळुरू-नागपूर-बेंगळुरू ९ ऑगस्टपासून सुरू होईल. ही उड्डाणे आठवड्यात चार दिवस राहतील.इंडिगो एअरलाईन्सने जारी केलेल्या उड्डाणाच्या शेड्यूलनुसार ६ई ६८९७ बेंगळुरू-नागपूर (सोम, बुध, शुक्र, रवी) विमान सकाळी १०.२० वाजता नागपुरात पोहोचेल आणि ६ई ६२६९ नागपूर-बेंगळुरू सकाळी १०.५० वाजता रवाना होईल. जूनच्या अखेरीस नागपुरातून काही उड्डाणे सुरू झाली होती. यामध्ये दिल्ली, मुंबई नियमित आहेत. त्यानंतर कोलकाता आणि पुणेकरिता उड्डाणे सुरू झाली, पण कोलकाताचे संचालन सध्या थांबले आहे. यादरम्यान दक्षिणेकडे नागपुरातून कोणतेही उड्डाण नव्हते. बेंगळुरूकरिता विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेंगळुरूमध्ये लॉकडाऊन असल्याने नागपुरात अडकलेले नोककदार कामावर परत जाण्यासाठी प्रतीक्षा करीत आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी असून त्यांना प्रवासाकरिता अडचणी येत आहेत.
नागपूर-बेंगळुरू विमानसेवा ९ ऑगस्टपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:30 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची जवळपास चार महिन्यापासून बंद असलेली नागपूर-बेंगळुरू-नागपूर विमानसेवा ९ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे.
नागपूर-बेंगळुरू विमानसेवा ९ ऑगस्टपासून
ठळक मुद्देइंडिगो एअरलाईन्सची चार महिन्यानंतर सेवा पूर्ववत होणार