शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ऑटोचालकाने चाकूच्या धाकावर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:00 IST

पायी जात असलेल्या एका तरुणाला टेका नाका परिसरात सोडून देतो, अशी बतावणी करून गुंड ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार मिळताच पावपावली पोलिसांनी लुटारू ऑटोचालक शेख सुलतान शेख मोहम्मद (वय १९) आणि राहिल खान राशिद खान (वय २१) या दोघांना अटक केली.

ठळक मुद्देगोंदियाच्या तरुणाची रक्कम लंपास : पाचपावली पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पायी जात असलेल्या एका तरुणाला टेका नाका परिसरात सोडून देतो, अशी बतावणी करून गुंड ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार मिळताच पावपावली पोलिसांनी लुटारू ऑटोचालक शेख सुलतान शेख मोहम्मद (वय १९) आणि राहिल खान राशिद खान (वय २१) या दोघांना अटक केली.गोंदिया जिल्ह्यातील कामठा (झिरीमिरी) येथील सुनील दादुराम फरकुंडे (वय २६) हा बुधवारी रात्री बुद्धनगरातील मोठ्या गुरुद्वारासमोरून जात होता. त्याच्या मागून एक ऑटो आला. कुठे जातो, असे विचारले असता सुनीलने त्याला टेका नाका म्हणताच सोडून देतो, असे म्हणत आरोपी सुलतान आणि राहिलने त्याला आपल्या ऑटोत बसविले. काही अंतरावर त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ७०० रुपये हिसकावून घेत त्याला धक्का मारून बाहेर काढले. त्यानंतर आरोपी पळून गेले. सुनीलने या प्रकरणाची तक्रार नोंदविताच पाचपावली पोलिसांनी धावपळ करून आरोपी सुलतान तसेच राहिलला शोधून काढले. त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेतील ४५० रुपये, चाकू तसेच गुन्ह्यात वापरलेला ऑटो जप्त करण्यात आला.परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, पीएसआय टी. एम. ढाकुलकर, हवलदार राजू अवस्थी, नायक राज चौधरी, विनोद लांडे, विनोद बरडे, गजानन निशितकर, सचिन सोनवणे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Robberyदरोडाauto rickshawऑटो रिक्षा