शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणाला कारने चिरडण्याचा प्रयत्न,चाकूनेही हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 00:35 IST

जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे नंदनवनमध्ये थरार, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ११.३० वाजता ही थरारक घटना घडली.अक्षय अशोक खोब्रागडे (वय २८) असे जखमीचे नाव असून, तो सध्या खासगी इस्पितळात दाखल आहे. तर, त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे शिवम जयस्वाल, नीरज भोयर आणि सोनू काळबांडे आहे.खोब्रागडे नंदनवनमधील देशपांडे ले-आऊटमध्ये राहतात. त्याच भागात शिवम जयस्वाल राहतो. त्याच्यासोबत खोब्रागडेचा जुना वाद आहे. त्यांनी एकमेकांविरुद्ध यापूर्वी तक्रारीही केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खोब्रागडे सोमवारी रात्री ११.३० वाजता पाळीव श्वान परिसरात फिरवीत असताना जयस्वालने वेगात कार चालवून त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत खोब्रागडेंनी बाजूला उडी मारल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पोलवर धडकली. त्यानंतर आरोपी नीरज भोयर कारबाहेर आला आणि त्याने खोब्रागडेवर चाकूहल्ला चढवला. खोब्रागडेंनी घट्टपणे चाकू पकडून प्रतिकार केल्याने आरोपी सोनू काळबांडेने त्यांच्यावर मागून लाकडी दंड्याने वार करून त्यांना जबर जखमी केले. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावल्याने आरोपी पळून गेले. खोब्रागडेंनी नंदनवन पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पीएसआय बारड यांनी प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली शिवम जयस्वाल, नीरज भोयर आणि सोनू काळबांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर