शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संतप्त प्रवाशांनी संत्रागाछी एक्स्प्रेस पाऊण तास रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:29 IST

कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली.

ठळक मुद्देआठवेळा चेनपुलिंग : कोचमध्ये घाण, पाणीही संपले

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कोचमध्ये खूप कचरा साचलेला, शौचालयातील पाणीही संपले. यामुळे संतप्त झालेल्या संत्रागाछी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी पाऊणतास रोखून धरली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.०५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर घडली.रेल्वेगाडी क्रमांक १२७६८ हुजूर साहेब नांदेड-संत्रागाछी एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर सकाळी ९.०५ वाजता पोहोचली. या गाडीच्या एस-६ या कोचमधील पाणी संपले होते. याशिवाय कोचमध्ये खूप कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली होती. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच प्रवाशांनी त्वरित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. ९.३० वाजता गाडी पुढील प्रवासाला निघाली असता प्रवाशांनी चेनपुलिंग केली. गाडीतील कचरा साफ करून पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याचा पावित्रा प्रवाशांनी घेऊन तब्बल आठवेळा चेनपुलिंग करीत गोंधळ घातला. प्रवासी संतापल्याचे पाहून रेल्वेचे अधिकारी आणि आरपीएफ जवान प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचले. त्यांनी प्रवाशांची समजूत घातली आणि त्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर