शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

नागपूरही हादरले

By admin | Updated: April 26, 2015 02:15 IST

सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी दिवसभर भयग्रस्त वातावरण होते. भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नागपूरकर पुरते हादरले होते.

नागपूर : नेपाळसह, उत्तर भारतात शनिवारी सकाळी ७.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले असतानाच नागपुरातही सकाळी ११.३० ते दुपारी ११.५० च्या दरम्यान पाच ते दहा सेकंदाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उत्तर, दक्षिण व पश्चिम नागपुरात याचा प्रभाव अधिक जाणवला. काही ठिकाणी घरातील भांडी पडली, फर्निचर हलले, खिडक्यांच्या काचांना तडा गेली. एकाएक इमारत हलत असल्याचे जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी दिवसभर भयग्रस्त वातावरण होते. भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नागपूरकर पुरते हादरले होते. भूकंपाची अधिकृत नोंद नाहीनेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के नागपूरमध्येही बसले, अशी चर्चा दिवसभर शहरात असली तरी त्याची अधिकृत नोंद नाही, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ही अफवाच होती, असे सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनातर्फे नागपूरचा हवामान विभाग, जीएसआय (जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया)आणि दिल्लीतील एनडीआरएम (राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव व्यवस्थापन ) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर नागपूरमध्ये कुठेही भूकंपाचे धक्के बसले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. उत्तर प्रदेश,बिाहर आणि गुजरात वगळता इतर राज्यात धक्के बसले नाहीत, असे एनडीआरएमकडून सांगण्यात आले,असे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी स्पष्ट केले. भूकंपाच्या दृष्टीने नागपूर अत्यंत सुरक्षित शहर समजले जाते. शहरात भूकंपाचे सर्वाधिक धक्के उत्तर नागपुरात बसले. शनिवारी दुपारी ११.३० ते ११. ५० च्या सुमारास शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना विशेषत: फ्लॅटधारकांना भूकंपाचे धक्के जाणवले. कुणी सोफ्यावर तर कुणी पलंगावर बसून टीव्ही पाहत असताना अचानक सोफा हलत असल्याचे जाणवले. महिलांना स्वयंपाक करीत असताना भांड्याची रॅक हलली. काही वेळ कुणालाच काही समजले नाही. परंतु इतर लोकांनाही तसाच अनुभव आल्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे लक्षात आले आणि तारांबळ उडाली. धावपळ करीत सर्व आपापल्या इमारती खाली उतरले. एक-दोन मिनिटांत ३ ते ४ वेळा धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. नागपुरातील हनुमाननगर, नेहरूनगर, सक्करदरा, भांडेप्लॉट, रामदासपेठ, पार्वतीनगर, जाफरनगर, तुकडोजीनगर, मानेवाडा, सदगुरुनगर, मानकापूर, जरीपटका, अनंतनगर, सदर या भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्या-त्या भागातील नागरिकांनी सांगितले. लोकमतच्या चमूने दुपारी १२ ते दुपारी ३ वाजतापर्यंत शहरातील विविध भागातील नागरिकांशी संपर्क साधला असता अनेकांनी या सौम्य धक्क्याची माहिती दिली.