शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:24 IST

संचालित होणाऱ्या विमानांचे प्रकार आणि उड्डाणाची संख्या पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ संकटकाळात आपल्या श्रेणीत बदल करू शकते.

ठळक मुद्देआठ हजार उंचीपर्यंत दाब सहनीय

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संचालित होणाऱ्या विमानांचे प्रकार आणि उड्डाणाची संख्या पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ संकटकाळात आपल्या श्रेणीत बदल करू शकते.नागपूर विमानतळ फायर व क्रॅश स्टॅण्डर्डमुळे सातव्या श्रेणीत मोडते. पण जेट बोर्इंग-७७७ आणि एअरबस-३२० या सारख्या मोठ्या विमानाच्या आकस्मिक लॅण्डिंगची सूचना मिळताच सूचनेपासून लॅण्डिंगपर्यंत विमानतळाचा सातव्या श्रेणीतून आठव्या श्रेणीत बदल होतो. सातव्या वर्गवारीत नागपूर विमानतळावर तीन अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी, फायर स्टेशन कर्मचारी, फायर क्रॅश टेंडरसह अन्य सुविधांचा समावेश आहे. याच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी मॉक ड्रीलच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येते. जेटचे मुंबई-जयपूर विमान-९डब्ल्यू ७९७ च्या घटनेसंदर्भात अधिकाऱ्याना विचारणा केली असता त्यांनी नागपूर विमानतळावर सर्व सोईसुविधा असल्याचे सांगितले.

विमानतळावर सर्व सोईसुविधाउड्डाणाची संख्या आणि विमानांच्या प्रकारानुसार विमानतळावर संकटकाळात मात करण्यासाठी पुरेपूर व्यवस्था आहे. पूर्वसूचना मिळताच विमानतळ सातव्या वर्गवारीतून आठव्या वर्गवारीत परावर्तित करता येते. याकरिता खासगी रुग्णालयाशी करार केला आहे. शिवाय मेयो रुग्णालयातून आवश्यक संख्येत डॉक्टरांना बोलविता येऊ शकते.-विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

आठ हजार उंचीपर्यंत दाब सहनीयफेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार आठ हजार फूट उंचीवर विमानात प्रवाशांना आणि केबिनमध्ये हवेचा दाब सहन करता येतो. विमानाची उंची त्यापेक्षा जास्त असली तर प्रवासी आणि चालक दलासाठी केबिनमध्ये विशेष यंत्रणेद्वारे सुरक्षित आणि आरामदायक वातावरण तयार करता येते. जास्त उंचीवर आॅक्सिजनचा स्तर कमी झाल्यास त्याचा फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम होतो. विमान जास्त उंचीवर गेल्यास हवेचा दाब कायम ठेवणारी यंत्रणा स्वयंचलित काम करते. पण जेट एअरलाईन्सच्या मुंबई-जयपूर विमानातील घटना १४ हजार फूट उंचीवर घडली. त्यावेळी काय झाले हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर