शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांचा हवाई प्रवास वाढला; वर्षभरात तीन लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 10:24 IST

उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे कमी शुल्कात प्रवासामुळे पसंती

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत सुमारे तीन लाखांची वाढ झाली आहे. वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये प्रवाशांची संख्या २१ लाख ७६ हजार ४३९ , तर वित्तीय वर्ष २०१६-१७ मध्ये ही संख्या १९ लाख ३८ हजार असल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) सूत्रांनी दिली.दोन वर्षांत देशात विभिन्न शहरांसाठी उड्डाण आणि जोडणी वाढल्याचा फायदा नागपुरात एव्हिएशन क्षेत्राला झाला आहे. विमान कंपन्यांमध्ये वाढती स्पर्धा हे मुख्य कारण आहे. सध्या नागपुरात दिल्ली, मुंबई, इंदूर, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, पुणे, रायपूर, अलाहाबादसाठी उड्डाणे उपलब्ध आहेत.भौगोलिकदृष्ट्या नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे विमानाने देशाच्या मोठ्या शहरांचे अंतर एक, दीड वा दोन तासांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे त्याचे शुल्क मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास दिल्ली-हैदराबाद विमानाचे अंतर १५४७ कि़मी. आहे. हे अंतर विमानाने दोन तासात गाठता येते. मुंबई-कोलकाता अंतर १३०५ कि़मी. असून ते गाठण्यासाठी दोन तास पाच मिनिटे लागतात. नागपूर-बेंगळुरू अंतर ९२५ कि़मी. असून १ तास ४० मिनिटात पोहोचता येते. नागपूर-कोलकाता अंतर ९६७ कि़मी. आहे. हे अंतर पार करण्यासाठी १ तास ४० मिनिटे तर नागपूर-दिल्लीच्या ८५२ कि़मी.करिता १ तास ३५ मिनिटे आणि नागपूर-हैदराबादच्या ४२३ कि़मी.करिता एक तास लागतो. रेल्वेमध्ये वेटिंग जास्त असल्यामुळे एसी सेकंड क्लासमध्ये प्रवास करण्यास सक्षम असलेले प्रवासी विमान आणि रेल्वे प्रवास शुल्कात कमी अंतर असल्यामुळे ते हवाई प्रवासाला प्राधान्य देत आहेत. नागपुरातून दिल्ली व मुंबईला जाणारे व्यावसायिक किमान एकवेळ हवाई मार्गाने प्रवास करीत आहेत.

स्वस्त व विशेष उड्डाणांनी प्रवास शक्यनागपुरातील एअर इंडियाच्या एमआरओमुळे विमान कंपन्या नागपुरातून सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. एअर इंडियाचे दिल्ली, मुंबई वा अन्य शहरातून आॅपरेट होणारे विमान नागपुरात विमानांची देखरेख आणि दुरुस्तीसाठी येतात. दुरुस्तीनंतर डीजीसीएच्या मंजुरीनंतर व्यावसायिक विमानाच्या स्वरूपात उड्डाण भरते. अशा विमानांचे बुकिंग किफायत शुल्कासह काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात येते. अशा विमानाचे भाडे तीन हजारांपर्यंत असल्यामुळे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या विशेष विमानांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.

टॅग्स :Travelप्रवास