शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: मोतीबिंदू शस्त्रक्रियेत ‘एम्स’चे काम असमाधानकारक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र 

By सुमेध वाघमार | Updated: May 19, 2024 20:40 IST

Nagpur: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) २०२३-२४ या वर्षात दिलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा उद्दिष्टांच्या तुलनेत केवळ  ६ टक्केच उद्दिष्ट गाठता आले. हे काम असमाधानकारक असल्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘एम्स’ला दिले.

- सुमेध वाघमारे नागपूर - राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) २०२३-२४ या वर्षात दिलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा उद्दिष्टांच्या तुलनेत केवळ  ६ टक्केच उद्दिष्ट गाठता आले. हे काम असमाधानकारक असल्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘एम्स’ला दिले. पुढील वर्षात दिलेल्या उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचा सूचनाही पत्रातून केल्या आहेत.

जगभरातील अंधत्वाचे मुख्य कारण ठरलेल्या मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच पर्याय आहे. कोरोना काळातील अडीच वर्षात शासकीय रुग्णालयांमध्ये मोतीबिंदूच्या फार कमी शस्त्रक्रिया झाल्याने प्रलंबित शस्त्रक्रियांची संख्या सुमारे तीन लाखांनी वाढल्या आहेत. यात दरवर्षी सुमारे ४० ते ५० हजार नव्या रुग्णांची भर पडत असल्याने विशेषत: शासकीय रुग्णालयांना राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२४-२५च्या आर्थिक वर्षात उद्दिष्ट वाढून दिले आहे. मागील वर्षी शासकीयसह एनजीओ हॉस्पिटल व खासगी रुग्णालयांना ३८ हजार ५८८ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्टे असताना १०९ टक्के म्हणजे ४२ हजार ०७९ शस्त्रक्रिया झाल्यात. यात शासकीय रुग्णालयांना ७४ टक्केच टक्के उद्दिष्टे पूर्ण करता आली. मेयाने ८५ टक्के, मेडिकलने ६१ टक्के तर, एम्सने ६ टक्के उद्दिष्टे पूर्ण केले. या वर्षी मेडिकलला ३ हजार ६००, मेयोला ३ हजार २०० तर ‘एम्स’ला १ हजार शस्त्रक्रियेचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘एम्स’ला पत्र देऊन या वर्षी तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचा सूचना केल्या आहेत. याला ‘एम्स’ किती गंभीरतेने घेते ते येत्या काळात दिसून येणार आहे. 

लेन्सपासून ते काळ्या चष्म्याचीही मोफत सोयराष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाºया लेन्ससह औषधींपासून ते काळ्या चष्म्याची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, यंत्र सामूग्री उपलब्ध असल्याने या वर्षी तरी शासकीय रुग्णालये १०० टक्के उद्दिष्टे गाठतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य