शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाचा उन्हाळ्यासाठी ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना ...

ठळक मुद्देशहरातील उद्याने दिवसभर सुरूदुपारी विश्रांती घेण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तापमान वाढायला सुरुवात झाली असून, या वाढलेल्या तापमानात नागपूरकरांना उष्माघाताचा धोका आहे. यामुळे उन्हापासून लोकांचे संरक्षण व्हावे, यासाठी महापालिकेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी सुरू केली आहे.यानुसार दुपारी १ ते ४ या उन्हाच्या वेळात काम करणाऱ्या कामगारांचे काम बंद करावे, त्यांना सावलीत विश्रांती द्यावी, अशा सूचना सर्व विभागाला महापालिकेतर्फे देण्यात आल्या आहेत. कामगारांना उन्हात विश्रांतीसाठी शहरातील सर्व उद्याने खुले करण्यात आली आहेत. तसेच नागपुरातील प्रमुख चौकांमध्ये पाणपोईची सोय करण्यात आली आहे.नागपूरसह विदर्भात उन्हाळ्यातील तापमान ४४-४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत वाढलेल्या तापमानामुळे लोकांच्या आरोग्याच्याही समस्या निर्माण होतात. दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे अशक्य होते. पण कामगारांना पोट भरण्यासाठी काम करायला घराबाहेर पडावेच लागते. अकुशल कामगारांना तर उन्हातच काम करावे लागत असल्याने त्यांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. दरवर्षी हजारो नागरिकांना उष्माघातामुळे आजारी पडावे लागते. अनेकदा यात मृत्यू होण्याची शक्यता असते.मागील काही वर्षांत उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात हिट अ‍ॅक्शन प्लॅन लागू केला. यानुसार शक्यतो दुपारी १ ते ४ या वेळेत काम करू नये, असे आवाहन करण्यात आले. तसेच शहराच्या सर्व प्रमुख ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या मॉल्समध्ये एक शीतखोली तयार केली जाणार आहे. शहरातील सर्व गार्डन दिवसभर सुरू ठेवण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्याच्यावर उपचारासाठी १०८ या क्रमांकाच्या दूरध्वनीवर त्वरित अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध होईल, अशा २५ अ‍ॅम्बुलन्स सज्ज राहणार आहते. शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये शीत वॉर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शाळा सकाळी भरणारवाढत्या उन्हाचा प्रभाव बघता दुपारच्या सत्रातील शाळा सकाळच्या सत्रात घेतल्या जाणार आहे. नागरिकांनी उष्माघातापासून कसा बचाव करावा, हे सांगण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहते. उन्हाळा अनेकदा जीवावर बेतण्याची भीती असते. त्यामुळे महापालिकेच्या या हिट अ‍ॅक्शन प्लॅनचा उपयोग नागरिकांना होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका