शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर दुर्घटना : पाच मिनिटासाठी बाहेर आला अन् जीव वाचला; कामगारानं सांगितली आपभीती

By जितेंद्र ढवळे | Updated: December 17, 2023 14:56 IST

कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. 

सोलार एक्सप्लोसिव कंपनी चाकडोह ( जि. नागपूर ) येथे रविवारी सकाळी 9 वाजाता झालेल्या स्फोटात 6 महिला व 3 पुरुष अश्या एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला तर तीन लोक बचावले. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही. 

या घटनेपूर्वी कंपनीतील कामगार संजय गुलाबराव आडे फक्त पाच मिनिटांसाठी बाहेर आले. त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. संजय गुलाबराव आडे (51) हे सोलार कंपनीत गत 20 वर्षांपासून कामगार म्हणून काम करतो. त्यांनी माहिती दिली की, आज सकाळी 6 ते  दुपारी 2 पर्यतच्या शिफ्टमध्ये सीबीएच 2 प्लांट  मध्ये कामावर असताना युनिटमधील सुपरवायझर मोसम राजकुमार पटेल यांनी त्यांना रिकामे खड्ड्याचे खोके  युनिट बाहेर नेण्यास सांगितले. त्यामुळे ते खोके घेऊन बाहेर गेले. खोके ठेवून परत येत असताना ते युनिटपासून 100 मिटर अंतरावर असताना हा भीषण स्फोट झाला. त्यांच्या डोळ्या देखत सीबीएच 2 ची संपूर्ण इमारत जवळपास 50 फूट उंच उसळून खाली कोसळली. त्यात सुपरवायझर मोसम पटले सह 9 लोकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळ संपूर्ण सील करण्यात आले आहे. जोपर्यंत घटनास्थळ सुरक्षीत अल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत मृतदेह बाहेर काढता येणार नाही. NDRF सह इतर टीम घटानास्थळी पोहचत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात येतील. दरम्यान, कंपनीतील कामगार आक्रमक झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे. 

मृतांची नावे अशी - 1) युवराज किसनाजी चारोडे बाजारगाव2) ओमेश्वर किसनलल मछिर्के चाकडोह, ता. नागपूर 3) मिता प्रमोद उईके अंबाडा सोनक ता. काटोल, जि. नागपूर 4)आरती निळकंठा सहारे ता. कामठी, जि. नागपूर 5) श्वेताली दामोदर मारबते कन्नमवार जि. वर्धा6) पुष्पा श्रीरामजी मानापुरे शिराला जि. अमरावती7) भाग्यश्री सुधाकर लोनारे भुज, ब्रम्हपुरी8) रुमिता विलास उईके ढगा जि. वर्धा9) मोसम राजकुमार पटले पांचगाव जि.भंडारा.

टॅग्स :nagpurनागपूर