लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरातील जुने फर्निचरचे फोटो ओएलएक्सवर टाकणे एका इसमास चांगलेच महागात पडले. आरोपींनी त्याची ९९ हजारांनी ऑनलाईन फसवणूक केली.पीडब्ल्यूडी कॉलनी, येथे राहणारे शायन शामल कोहली (३२) यांनी आपल्या घरातील फर्निचर विकायचे असल्याने फर्निचरचे फोटो काढून ओएलएक्सवर अपलोड केले. हे फोटो बघून कन्हैय्या कुमार नावाने ७८७३६२३७९४ या क्रमांकावर त्यांना कॉल आला. मला तुमचे फर्निचर आवडले आहे, असे कोहली यांना सांगितले. तुमच्या व्हॉट्सअॅपवर क्यू.आर. कोड पाठविला आहे. त्याला स्कॅन केल्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होईल, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे कोहली यांनी क्यू.आर. कोड स्कॅन केला असता, त्यांच्या खात्यातून ९८८८८ रुपये आरोपीने वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे कोहली यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गिट्टीखदान येते तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आय.टी. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.
नागपुरात ऑनलाईन व्यवहारात ९९ हजारांनी फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:24 IST
घरातील जुने फर्निचरचे फोटो ओएलएक्सवर टाकणे एका इसमास चांगलेच महागात पडले. आरोपींनी त्याची ९९ हजारांनी ऑनलाईन फसवणूक केली.
नागपुरात ऑनलाईन व्यवहारात ९९ हजारांनी फसविले
ठळक मुद्देओएलएक्स ठरले माध्यम