शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:32 IST

बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांची नागपुरात आयात होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लकडगंज झोन क्षेत्रात दोन ठिकाणी धाडी घालून ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ‘लोकमत’ने बंदी असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याबाबतचा वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने लकडगंज झोनमध्ये दोन ठिकाणी धाडी घातल्या.

ठळक मुद्देमहापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या लकडगंज झोनमध्ये दोन ठिकाणी धाडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांची नागपुरात आयात होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने लकडगंज झोन क्षेत्रात दोन ठिकाणी धाडी घालून ३५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ‘लोकमत’ने बंदी असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याबाबतचा वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने लकडगंज झोनमध्ये दोन ठिकाणी धाडी घातल्या.मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधून प्लास्टिक पिशव्यांची मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने आयात केली जाते. मालाची खेप आल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेमा देशपांडे व उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरेसेन तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठी कारवाई असल्याने लकडगंज झोनसह नेहरूनगर, सतरंजीपुरा व गांधीबाग झोनच्या पथकातील जवानांना यात सहभागी करण्यात आले. प्रथम टेलिफोन एक्सचेंज परिसरात एका वाहनातून १५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर पथकाने याच परिसरातील साईबाबा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर धाड घातली असता ४७ बॅगात २००० किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. दोन्ही ठिकाणचा माल जप्त करण्यात आला.दोषींना प्रत्येकी पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची आयात केली जाते. या सामानाच्या पिशवीवर दुसऱ्या मालाचे नाव असते.प्रदूषण नियंत्रण मंडळाला लकडगंज झोन क्षेत्रातील काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक प्लास्टिकची चोरटी आयात करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी महापालिकेला मदत मागितली. सुरुवातीला लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी होणार होते. परंतु कारवाई मोठी असल्याने यात नेहरूनगर, सतरंजीपुरा व गांधीबाग झोनच्या पथकांना सहभागी करण्यात आले. यासंदर्भात लकडगंज पोलिसांना सूचित करण्यात आले आहे.दंडाची रक्कम नाममात्रबंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर वा विक्री करताना आढळून आल्यास एक किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या तर पाच हजार दंड आकारला जातो. दोन हजार किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या तरी तितकाच दंड आकारला जातो. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा व्यापार करणाऱ्यांना कायद्याची भीती वाटत नाही.झोनची उदासीन भूमिकाउपद्रव शोधपथक आपल्या स्तरावर प्रदूषण नियंत्रण मंडळाशी समन्वय साधून कारवाई करीत आहे. परंतु झोन स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे कारवाईला मर्यादा येत आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी