शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | २९ दिवसांत स्वाइन फ्लूचे ३४ रुग्ण; कोरोनामुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 12:59 IST

मृत्यूचे ऑडिटच नाही

नागपूर : कोरोनापाठोपाठ स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या वर्षात स्वाइन फ्लूच्या ४० रुग्णांची नोंद झाली. यातील ३४ रुग्ण हे मागील २९ दिवसांतील आहेत. शिवाय, सलग तिसऱ्यादिवशी कोरोना मृत्यूची नोंद झाल्याने व २१५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नागपूर जिल्ह्यात २००९ पासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. २०१७ मध्ये या रोगाने सर्वाधिक ११९ रुग्णांचे जीव गेले. मात्र, मागील दोन वर्षांत केवळ सहाच रुग्णांची नोंद असताना, आता पुन्हा या रोगाने डोके वर काढले आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सहा रुग्ण, तर, १ ते २९ जुलैदरम्यान ३४ रुग्ण आढळून आले आहेत. यातील २७ रुग्ण शहरातील असून, १३ रुग्ण हे ग्रामीण भागातील व इतर जिल्ह्यांतील आहेत.

- स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे मृत्यू

स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. परंतु त्याचे ‘डेथ ऑडिट’ झालेले नाही. उपसंचालक आरोग्य विभागाची लवकरच यावर बैठक होणार आहे. त्यानंतरच मृत्यूबाबतची घोषणा होणार असल्याचे संबंधित आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

-कोरोनाचे शहरात १४२, तर ग्रामीणमध्ये ७३ रुग्ण

शुक्रवारी कोरोनाच्या २ हजार १६६ चाचण्या झाल्या. यात शहरातून १४२, तर ग्रामीणमधून ७३ असे एकूण २१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्या तुलनेत २१७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार १६६ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील १ हजार ५८६ रुग्ण गृह विलगीकरणात, तर ७६ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

- गांधीबाग झोनमधील कोरोना रुग्णाचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेला ४० वर्षीय रुग्ण हा मनपाच्या गांधीबाग झोनमधील रहिवासी होता. कामठी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाला मूत्रपिंडाचा जुना विकार होता. मृत्यूची एकूण संख्या १० हजार ३३४ वर पोहोचली आहे.

- स्वाइन फ्लूची स्थिती (जानेवारी ते २९ जुलै)

: शहरात २७ रुग्ण

: नागपूर ग्रामीण व इतर जिल्ह्यात १३ रुग्ण

- कोरोनाची स्थिती (शुक्रवार)

: २१५ रुग्ण पॉझिटिव्ह

: ०१ पुरुष रुग्णांचा मृत्यू

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस