शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

CoronaVirus in Nagpur : नागपुरात परिचारिकेसह २४ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५८३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:12 PM

एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ५८३ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देबजाजनगरमध्ये पुन्हा रुग्णाची नोंद : आणखी दोन मनपा कर्मचारी पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या ५८३ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, बजाजनगर येथील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा तोंडावर असताना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या महिन्यात रुग्णांची संख्या उच्चांक गाठेल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. यामुळे घराबाहेर पडताना मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहेत. धंतोली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या वृद्धाचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. ३० मे रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे नमुने तपासण्यात आले. यात २४ वर्षीय परिचारिका पॉझिटिव्ह आली. ही परिचारिका बजाजनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, नागपुरात पहिला रुग्ण बजाजनगरातील होता. आता पुन्हा वसाहतीतील रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या तीन झाली आहे.सतरंजीपुरा झोनचे दोन कर्मचारी पॉझिटिव्हसतरंजीपुरा झोनमधील सोमवारी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्याचदिवशी या झोनअंतर्गत आरोग्य विभागातील चार डॉक्टर, तीन परिचारिका, हेल्थ वर्कर, डाटाएन्ट्री ऑपरेटर अशा ३७ लोकांचे नमुने आज मेयोमध्ये तपासण्यात आले. यात बिनाकी येथील एक महिला कर्मचारी तर सतरंजीपुरा झोनच्या समोर राहणारा एक पुरुष कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे उर्वरित लोकांना होम क्वारंटाईन करणार की, कामावर बोलविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.टिमकी येथील १३ रुग्ण पॉझिटिव्हमोमिनपुरा, सतरंजीपुरानंतर टिमकी हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे. आज या वसाहतीतून पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. वसाहतीतील रुग्णांची संख्या २६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे १४व्या दिवशी पॉझिटिव्ह आलेले आहेत.लोकमान्यनगर, मोमिनपुरा, भानखेडा येथील दोन रुग्णलोकमान्यनगर, मोमिनपुरा, नाईक तलाव व भानखेडा वसाहतीतील प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर हंसापुरी व मोमिनपुरा येथून प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण क्वारंटईन होते. नीरीच्या प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांमधून ४४ वर्षीय महिला गुमगाव येथील तर दुसरा २६ वर्षीय पुरुष रुग्ण हा कोंढाळी येथील आहे.सात महिन्याच्या गर्भवतीची कोरोनावर मातमोमिनपुरा येथील सात महिन्याच्या गर्भवतीने कोरोनावर मात केली. मेयो रुग्णालयातून तिला आज सुटी देण्यात आली. मेडिकलमध्ये भरती असलेल्या आठ रुग्णांना सुटी देण्यात आली. यातील चारही पुरुष रुग्ण लक्ष्मीनगर येथील आहेत. तर उर्वरित एक गड्डीगोदाम, एक मोमिनपुरा तर दोन टिमकी येथील आहेत. यांना दहा दिवसानंतर लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ३९९ झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २०५दैनिक तपासणी नमुने ५३९दैनिक निगेटिव्ह नमुने ५२१नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५८३नागपुरातील मृत्यू ११डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३९९डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,७८४क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८६३पीडित-५८३-दुरुस्त-३९९-मृत्यू-११

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर