शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

CoronaVirus in Nagpur : नागपुरात तब्बल १७२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 22:46 IST

जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात १८३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १७२ वर पोहचली.

ठळक मुद्दे ग्रामीणमध्ये ६१ नवे रुग्ण : दुसऱ्यांदा रुग्णसंख्येचा उच्चांक : १०० कोरोनाबाधित रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात १८३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १७२ वर पोहचली. शिवाय, अकरा दिवसांपासून मृत्यूसत्र सुरूच असून आज दोन रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. एकूण रुग्णसंख्या ३,४६५ तर मृतांची संख्या ६५ झाली आहे. शहरासोबत ग्रामीणमध्ये रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे, आज ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दिलासादायक म्हणजे, १०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.या महिन्यात गेल्या २३ दिवसांमध्ये १९६० रुग्ण व ४० मृत्यूची नोंद झाली आहे. यातच सलग तिसºया दिवशी शंभरवर रुग्णसंख्या गेल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे. आज मृत्यूची नोंद झालेल्या ६६वर्षीय रुग्णाचा मेयोमध्ये बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. हा रुग्ण १६ जुलै रोजी मेयोत दाखल झाला होता. रुग्णाला उच्च रक्तदाब, टाईप टू मधुमेह, मूत्रपिंडाचा आजार व न्युमोनियाचा आजार होता. विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत कामठीमधील हा तिसरा मृत्यू आहे. दुसरा मृत्यू मेडिकलमध्ये झाला. बाभुळखेडा येथील ७०वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. सुरुवातीला जयभीमनगर येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर बुधवारी मेडिकलमध्ये दाखल केले होते. श्वसनक्रिया निकामी झालेल्या या महिलेवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.खासगी लॅबमधून वाढत आहे रुग्णसंख्याखासगी लॅबमधून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज येथून ४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. याशिवाय, एम्सच्या प्रयोगशाळेतून ६२, रॅिपड अ‍ॅण्टीजन चाचणीतून २३, मेयोच्या प्रयोगशाळेतून १७, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १०, नीरीच्या प्रयोगशाळेतून आठ तर माफसूच्या प्रयोगशाळेतून सात असे एकूण १७२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.कामठीत ४० रुग्ण पॉझिटिव्हइतर तालुक्याच्या तुलनेत कामठी तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ४० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या २९८ वर पोहचली आहे. याशिवाय, काटोल तालुक्यात ६, खापरखेड्यात ३, कन्हान तालुक्यात ९, कळमेश्वर, वाडी व कुही तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण असे एकूण ६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.सुरू होताच नवे ‘सीसीसी’ फुल्लआमदार निवासात सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरच्या (सीसीसी) खाटा वाढून ३७५ वर नेण्यात आल्या. गुरुवारी हे सेंटर फुल्ल झाल्यानंतर हिंगण्यातील शालिनीताई मेघे मेडिकल कॉलेजमध्ये ‘सीसीसी’ सुरू करण्यात आले. येथे मेडिकलमधून ४० रुग्ण भरती होताच सुरू होण्यापूर्वीच तेही फुल्ल झाले. आता सदर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृहात ‘सीसीसी’ सुरू होण्याची शक्यता आहे.या वसाहतीत आले पॉझिटिव्ह रुग्णसायंकाळी ५ वाजेपर्यंत मनपाकडे नोंद झालेल्या रुग्णांमध्ये जगनाडे चौक नंदनवन येथील ५, सीए रोड १, कुंभारटोली १, सेव्हन स्टार हॉस्पिटल १, महाल १, शांतिनगर १, सिद्धार्थनगर टेका १, जरीपटका ९, एसबीआय कॉलनी आनंदनगर २, वैष्णवदेवीनगर १, हिस्लॉप कॉलेज परिसर क्वॉर्टर १, हनुमाननगर १, हिंदुस्थान कॉलनी १, ताजबाग १, रवींद्रनगर १, तांडापेठ १, काटोल रोड १, बिनाकी मंगळवारी २, वैशालीनगर १, भगवाननगर १, रामनगर १, निकालस मंदिर १, मोहद्दीननगर १, डिप्टीसिग्नल १, भारतनगर १, वर्धमाननगर ४, अशोकनगर १, साईनगर १०, टेलिफोननगर दिघोरी ४, धंतोली १, इतवारी २, निर्मलनगरी १, राणी दुर्गावती चौक पंचशीलनगर १, स्नेहनगर १, न्यू शुक्रवारी १, छापरूनगर १, मस्कासाथ १, अवस्थीनगर १ व म्हाळगीनगर १ असे एकूण ७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.संशयित : ३५९२बाधित रुग्ण : ३४६५घरी सोडलेले : २२१३उपचार घेत असलेले रुग्ण : ११८८मृत्यू : ६५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर