शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

नागपुरात एमएस, एमडीच्या १० जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:33 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘मास्टर आॅफ सर्जरी’ (एमएस) व ‘डॉक्टर आॅफ मेडिसीन’च्या (एमडी) १० जागा वाढल्या.

ठळक मुद्देमेडिकल : बधिरीकरण विभागाला ७ जागांचा बोनस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘मास्टर आॅफ सर्जरी’ (एमएस) व ‘डॉक्टर आॅफ मेडिसीन’च्या (एमडी) १० जागा वाढल्या. यात ‘एमएस’ची एक तर ‘एमडी’च्या नऊ जागांचा समावेश आहे. यात बधिरीकरण विभागाला सर्वाधिक म्हणजे सात जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी मेडिकलला ३५ जागांची अपेक्षा होती. त्या तुलनेत २५ जागा कमी मिळाल्याचे बोलले जात आहे.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१८-१९ या वर्षात सर्व मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. भारतीय विज्ञान परिषदेने (एमसीआय) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. यामुळे राज्यात ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात व जिथे आवश्यक पायाभूत सोयी, मनुष्यबळ व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत अशा सर्व महाविद्यालयांच्या दुपटीने जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. नागपूरच्या मेडिकलमध्ये पदवीच्या २०० आणि पीजी अभ्यासक्रमाच्या १६७ जागा उपलब्ध आहेत. त्यात या नव्या निर्णयामुळे मेडिकलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणखी ३५ जागांची भर पडण्याची अपेक्षा होती. परंतु दहाच जागा वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या जागा वाढविण्यामागे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे अथक परिश्रम असल्याचे सांगितले जाते.-अशा वाढल्या जागाबधिरीकरण विभागातील ‘एमडी’च्या सात, बालरोग विभागातील ‘एमडी’ची एक, छाती व उररोग विभागातील ‘एमडी’ची एक तर कान, नाक, घसा विभागातील ‘एमएस’ची एक अशा १० जागा वाढल्याबधिरीकरण विभागातील पदविकाच्या जागा कायमसुत्रानूसार, बधिरीकरण विभागाने पदविकाच्या सहा जागा कमी करून ‘एमडी’च्या २६ वाढीव जागा मागितल्या होत्या. परंतु पदविकाच्या सहा जागा कमी न करता त्या तशाच ठेवून ‘एमडी’च्या सात जागा वाढविल्या. आता या विभागाकडे सहा पदविका, एमडीच्या १४ जागा झाल्या आहेत.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी