शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:17 IST

मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्दे पावसाअभावी प्रशासनाचा निर्णय : ८० टक्के भाविक विदर्भातील

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेशच्या पचमढी येथे गुरुवार, २५ जुलैपासून सुरू होणारी नागद्वार यात्रा प्रशासनाने पावसाअभावी काही दिवसांसाठी स्थगित केली आहे. पाऊस आल्यानंतरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय महादेव यात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात २५ जुलैला प्रशासनाची बैठक होणार आहे. पावसामुळे नागद्वार यात्रा स्थगित करण्याची कदाचित पहिलीच वेळ आहे.या यात्रेसाठी विदर्भातील ८० टक्के शिवभक्त जातात. त्यात सर्वाधिक भाविक नागपूरचे असतात. यात्रेसाठी भाविकांची महिन्यापूर्वीच तयारी सुरू असते. याशिवाय नागपुरातील अनेक मंडळाचे पदाधिकारी यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी या ठिकाणी हजर असतात. सध्या अनेक मंडळाचे पदाधिकारी धर्मशाळेत थांबले आहेत. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.अनेक वर्षांपासून नागपंचमीनिमित्त पचमढी येथे नागद्वार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. सातपुडा पर्वतरांगांमध्ये अत्यंत दुर्गम भागात नागद्वार स्वामीचे मंदिर आहे. भाविक तीन पर्वतांची १५ कि़मी. परिक्रमा करून मंदिरात दर्शन घेतात. पण यावर्षी पाऊस नसल्यामुळे पर्वतावरून वाहणाºया नद्या कोरड्या आहेत. धूपगड येथील गणेश मंदिराजवळील आणि पश्चिम द्वार येथील नदी कोरडी आहे. भाविकांना धूपगड येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पाऊस नसल्यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भणार आहे. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये आणि पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता मध्य प्रदेश शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी नागद्वार यात्रा क्षेत्राची पाहणी केली. पाण्याअभावी या भागात आजार पसरू शकतात, या शक्यतेने प्रशासनाने यात्रा स्थगित केल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशासकीय महादेव यात्रा समितीने सेवा आणि यात्रेसाठी येणाऱ्या नागद्वार सेवा मंडळाला पचमढीत येण्यास प्रतिबंध लावले आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMadhya Pradeshमध्य प्रदेश