शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यातील नगर पंचायत निवडणूक अडचणीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:50 IST

राज्यातील १२५ नगर पंचायतींची निवडणूक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी ठरविण्यात आलेल्या आरक्षणाविरुद्ध देवरी (गोंदिया) येथील संतोष तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : अध्यक्षपदाच्या आरक्षणाविरुद्ध याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील १२५ नगर पंचायतींची निवडणूक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदासाठी ठरविण्यात आलेल्या आरक्षणाविरुद्ध देवरी (गोंदिया) येथील संतोष तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.नगर परिषद व नगर पंचायतच्या निवडणुका महाराष्ट्र नगर पालिका निवडणूक नियम-१९६६ अनुसार घेतल्या जातात. परंतु १२५ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण ठरवताना नियमांची पायमल्ली करण्यात आली असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. २ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत आरक्षण प्रक्रिया अंतिम करण्यात आली. त्यानंतर १२५ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याकरिता राबविलेली प्रक्रिया नियमबाह्य होती. त्यामुळे गेल्यावेळी ज्या नगर पंचायतींचे अध्यक्षपद महिलांसाठी व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, त्यातील अनेक नगर पंचायतींचे अध्यक्षपद पुन्हा महिलांसाठी व खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्याविरुद्ध शासनाला १८ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन देण्यात आले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर केली जाऊ शकते. तसे झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांवर अन्याय होईल असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.अशी आहे विनंतीमहिला व खुल्या प्रवर्गासाठी ठरविण्यात आलेले आरक्षण अवैध ठरवून रद्द करण्यात यावे, हे प्रकरण प्रलंबित असेपर्यंत वादातील आरक्षणावर अंमलबजावणी करण्यात येऊ नये व निवडणूक जाहीर करण्यास मनाई करण्यात यावी अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे.शासनाला नोटीसन्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी सोमवारी नगर विकास विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयElectionनिवडणूक