शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विदर्भात नगर पंचायतीत काँग्रेस 'बाहुबली'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 10:57 IST

विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला.

ठळक मुद्दे४९३ पैकी १७२ जागांवर विजय : भाजपची ११६ जागांवर मजल

नागपूर : विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. राष्ट्रवादीकडे ६७, शिवसेनेकडे ४८, अपक्ष ४३ आणि इतर पक्षाचे ४३ उमेदवार विजयी झाले.

अमरावती जिल्ह्यातील २ नगरपंचायतीच्या ३४ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने दबदबा निर्माण केला. दोनपैकी एका नगरपंचायतीवर काँग्रेसने, तर एका नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानने बहुमत मिळविले. भाजपला मात्र २ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना ७ जागांवर राहिली. तर युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळविला.

चंद्रपूर जिल्ह्यातील ६ नगरपंचायतीच्या १०२ जागांपैकी ५३ जागा काँग्रेसला मिळाल्या. यात मंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर यांचा मोलाचा हातभार राहिला. त्यामानाने माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाजपकडे २४ जागाच आल्या. राष्ट्रवादी ८ आणि शिवसेनेला ८ जागांवर समाधान मानावे लागले. यासोबतच २ जागा वंचितकडे आणि ५ जागा गोडवाना गणतंत्र पक्षाच्या ताब्यात आल्या. तेथे नगरपंचायतीवर काँग्रेसने एकहाती या सत्ता मिळविली.

गोंदियात ३ नगरपंचातीच्या ५१ जागांपैकी १० जागांवर भाजप, १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, १० जागांवर काँग्रेसचा विजय झाला. सोबतच २ जागा शिवसेना आणि ७ जागांवर अपक्षाने बाजी मारली.

वर्धा जिल्ह्यातील ३ नगरपंचातीच्या ६८ जागांवर २१ काँग्रेसकडे, २० भाजपकडे, ४ राष्ट्रवादीकडे, २ शिवसेना, १६ अपक्ष आणि ५ इतर पक्षांचा समावेश आहे. इतर पक्षांमध्ये बसपा, शेतकरी संघटनेचा समावेश आहे. २ नगरपंचायतीवर काँग्रेसला बहुमत मिळाले. एका ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग बहुमत करण्यात आला. एका नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ३९ जागा काँग्रेसकडे आल्या. ४ राष्ट्रवादी, १३ भाजप, २५ शिवसेना, १२ अपक्ष आणि नऊ इतर विजय पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. इतर पक्षांमध्ये ४ जंगोम, ३ मनसे, १ वंचित आणि १ प्रहारच्या उमेदवाराचा समावेश आहे. यवतमाळातील ६ पैकी एका नगरपंचायतीवर काँग्रेस, तर ५ ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे.

नागपूर जिल्ह्यातील २ नगरपंचायतीच्या ३४ जागांपैकी काँग्रेस ८, राष्ट्रवादी ९, भाजप १३, शिवसेना १, अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक एक नगरपंचायतीवर बहुमत मिळाले. बुलडाण्यातील २ नगरपंचातींच्या ३४ जागांपैकी १६ जागा काँग्रेस, १ राष्ट्रवादी, ५ शिवसेना आणि १२ प्रहारचे उमेदवार विजयी झाले. तेथे एका ठिकाणी काँग्रेस, तर दुसऱ्या ठिकाणी प्रहार जनशक्तीला बहुमत मिळाले.

वाशिममील एका नगरपंचातीच्या १७ जागांपैकी १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसचे २ आणि भाजपच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सत्ता काँग्रेसने मिळविली.

२९ पैकी किती नगरपंचायती कुणाकडे?

११ - काँग्रेस

४ - राष्ट्रवादी काँग्रेस

५ - भाजप

१ - युवा स्वाभिमान

१ - प्रहार जनशक्ती

६ - त्रिशंकू

१ - महाविकास आघाडी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात तिन्ही नगरपंचायती हातून गेल्या

भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीत भाजप वरचढ ठरत ३ पैकी २ नगरपंचायतींवर ताबा मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १ नगरपंचायत आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा असलेल्या भंडाऱ्यात मात्र, काँग्रेसचीच पिछेहाट झाली. त्यांना एकाही नगरपंचायत ताब्यात घेता आली नाही. ५१ पैकी २४ जागांवर भाजप, १४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. तर, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या पदरात केवळ १० जागा पडल्या. ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले.

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Vidarbhaविदर्भ