लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)मधील विविध पदांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका रिट याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावून यावर ५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, पुढील आदेशापर्यंत विशेषज्ञ (व्हेटरनरी क्लिनिकल मेडिसिन) या पदासाठी कुणालाही नियुक्तीपत्र जारी करण्यास मनाई केली आहे.डॉ. दत्तात्रय इंगोले व डॉ. देवेंद्र नारायण यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे तसेच पीएच. डी. पदवी मिळविली आहे. त्यांनी विशेषज्ञ (व्हेटरनरी क्लिनिकल मेडिसिन) या पदासाठी अर्ज सादर केला होता. त्यांना १७ जानेवारी रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्यांची मुलाखतच घेण्यात आली नाही. त्यासंदर्भात तक्रार करूनही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. परिणामी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व पदभरतीसाठी त्यांचा विचार करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. विजय वानखेडे तर, शासनातर्फे अॅड. निवेदिता मेहता यांनी बाजू मांडली.
नागपुरातील ‘माफसू’तील पदभरतीत गैरव्यवहार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:59 IST
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)मधील विविध पदांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका रिट याचिकेत करण्यात आला आहे.
नागपुरातील ‘माफसू’तील पदभरतीत गैरव्यवहार?
ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : नियुक्ती आदेश देण्यास मनाई