शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागनदी प्रकल्पाला लवकरच सुरुवात : जिका आणि डीईएमध्ये मार्चमध्ये ऋणकरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:08 IST

नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन’ प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील महत्त्वपूर्ण ‘नागनदी प्रदूषण निर्मूलन’ प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. यासंबंधी आवश्यक कार्यवाहीला गती मिळाली आहे. नागनदी प्रकल्पासाठी आवश्यक खर्चासंदर्भात जपानची वित्तीय संस्था जिका (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) व डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स (डीईए) यांच्यात येत्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात महत्त्वपूर्ण ऋणकरार केला जाणार आहे.यासंबंधी नुकतीच दिल्ली येथे डीईएचे संचालक अविनाश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय, पर्यावरण विभाग, जिकाचे भारत व जपानच्या प्रतिनिधींसह मनपातर्फे कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी व मनपाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इस्राइल उपस्थित होते.नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महापौर संदीप जोशी यांच्याद्वारे प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जात आहे. २४१२.६४ कोटींचा हा प्रकल्प आहे. यात केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महापालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १४४७.५९ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ६०६.१६ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे ३६१.८९ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिका यांच्याकडून १८६४.३ कोटी रुपये ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षाकरिता अर्थसाहाय्य घेणार आहे.मनपा या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. प्रकल्पांतर्गत नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे होणार आहेत. नागपूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे. प्रकल्पासाठीच्या ऋणकरारामुळे प्रकल्पाच्या कार्याला लवकरच सुरुवात होण्याचे चिन्ह आहेत. प्रकल्पामुळे नागनदीचा चेहरामोहरा बदलणार आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीJapanजपान