शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:23 IST

शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टला जपानच्या जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) कंपनी सोबत नागनदीच्या प्रकल्पाची सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर प्रकल्पाला जपानकडून कर्ज देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जपान सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. बुधवारी या आशयाचा ई-मेल जायका कंपनीकडून प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देजपानकडून मिळणार १०६४.४८ कोटींचे कर्ज : मनपा १८७.८४ कोटींचा वाटा उचलणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टला जपानच्या जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) कंपनी सोबत नागनदीच्या प्रकल्पाची सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर प्रकल्पाला जपानकडून कर्ज देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जपान सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. बुधवारी या आशयाचा ई-मेल जायका कंपनीकडून प्राप्त झाला आहे.यामध्ये जपानच्या सरकारने जायकाद्वारे सादर केलेल्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवली आहे, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे.नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च १२५२. ३३ कोटी रुपये असून ८५ टक्के कर्ज १०६४.४८ कोटी रुपये जपान सरकार उपलब्ध करून देणार आहे तर प्रकल्पाच्या १५ टक्के निधीसाठी १८७.८४ कोटी रुपये इतकी रक्कम महानगरपालिका गुंतवणार आहे.नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये या प्रकल्पाचा मोलाचा वाटा असणार आहे. जपान सरकारने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराने नागनदी शुद्धीकरण प्रकल्पास गती मिळणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत नागनदी सोबतच पिवळी नदी आणि बोर नाला शुद्धीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.कामाला लवकरच सुरुवातमहापालिकेने नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदी पात्राच्या दोन्ही बाजुच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या क लम ३७ अंतर्गत या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे. शहरातील नागनदीची लांबी १६.७३२ किलोमीटर आहे. या भागाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीJapanजपान