शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये भीषण अपघातात तीन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 04:11 IST

भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव

सावनेर : भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे शनिवारी (दि. २९) रात्री ८.५० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स पेटविली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कमलाबाई मधुकर पालेकर (७५), उमेश विनायक दहीकर (२५) आणि आॅटोचालक गजानन पांडुरंग चांदूरकर (४०) सर्व रा. माळेगाव (टाऊन) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये  राजेंद्र मधुकर पालेकर (४०), अर्चना राजेंद्र पालेकर (३५), पारस राजेंद्र पालेकर (५) आणि सुनील चांदूरकर (२५) सर्व रा. माळेगाव (टाऊन) यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सावनेरच्या शासकीय रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले आहे. 

एमएच-४०/१३९२ क्रमांकाच्या आॅटोने सर्वजण माळेगाव (टाऊन) येथे जात होते. सावनेरकडून माळेगावकडे आॅटोने वळण घेताच नागपूरकडून सावनेर दिशेने येणा-या एमपी-२८/सी-०३०१ क्रमांकाच्या भरधाव ट्रॅव्हल्सने आॅटोला जबर धडक दिली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर सर्व गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच नागरिकांनी सावनेरच्या शासकीय रुग्णालयात भरती केले. तेथे गजानन चांदूरकरचा मृत्यू झाला. जखमी सर्वांवर प्रथमोपचार करून मेडिकलमध्ये हलविण्यास वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले. त्यानुसार सर्वांना नागपूरच्या मेडिकलमध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघात होताच संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स पेटविली. पाहता - पाहता आगीने अख्खी ट्रॅव्हल्स भस्मसात झाली. यावेळी सावनेर पोलीस घटनास्थळी असून काहीच करू शकले नाही. जमावासमोर पोलिसांचे काहीएक चालले नाही. ट्रॅव्हल्स विझविण्यासाठी सावनेर नगर परिषदेचे अग्निशमन दल आले असता नागरिकांनी त्यांच्या दिशेने गोटमार करून अग्निशमन दलाचा विरोध करीत त्यांना परत पाठविले. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळाहून पसार झाला.