शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच; फडणवीसांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 20:41 IST

Nagpur News शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आपला प्रस्ताव होता, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मंगळवारी आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाड्याच्या विकासावर भर

नागपूर : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आपला प्रस्ताव होता, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यास मान्यता दिली. पक्षाला सोनिया गांधींसारखे ‘एक्ट्रॉ कॉन्स्टिट्युशनल ऑथोरिटी’ (रिमोट कंट्रोल) नको असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सहभागी झालो, असेदेखील त्यांनी सांगितले. मंगळवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान ते बोलत होते.

२०१९ मध्ये जनादेश चोरून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते सरकार पन्नास टक्के राष्ट्रवादीचे, चाळीस टक्के काँग्रेसचे आणि उरलेले दहा टक्के शिवसेनेचे होते. शिवसेनेने हिंदुत्वाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पक्षाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्याने बंड केले नाही तर विद्रोह केला. शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार असून या यशात माझाही हातभार असेल, असा दावा फडणवीस यांनी केला. नवीन सरकारच्या स्थापनेत अमित शहा माझ्यासोबत उभे होते. त्यामुळे सत्ता परिवर्तन होऊ शकले. राज्यात शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री हे पद समांतर मुख्यमंत्री नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांना शिवसेनेचा वैचारिक वारसा

फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला नाही. उद्धव यांच्याकडे घराण्याचा वारसा असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैचारिक वारसा आहे. शिवसेना हा एक विचार असून तो बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाने प्रेरित आहे. या विचारसरणीवर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात प्रहार होत होता. उद्धव यांनी याचा विचार करावा, असे फडणवीस म्हणाले.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

सोमवारीच सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. अद्याप मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. लवकरच बैठक घेऊन मंत्रिमंडळाबाबत निर्णय घेतला जाईल. अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे विदर्भ-मराठवाड्याचे सरकार

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासच बंद झाला होता. आता राज्याला देशातील क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा प्रयत्न असेल. विदर्भ, मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागाचे हे सरकार आहे. विदर्भ आणि मराठवाडा त्यांच्या अजेंड्यावर आहे. आता येथे विकास होणार आहे. इतर क्षेत्रांकडेही लक्ष दिले जाईल. मात्र, विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही, असे फडणवीस म्हणाले.

समृद्धी महामार्गाचे लवकरच उद्घाटन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही पुन्हा सुरू होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून विकास साधण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ, वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार

ओबीसी आरक्षणाप्रती आमचे सरकार कटिबद्ध आहे. सरकार यासंदर्भातील त्रुटी दूर करून लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करेल. माजी मंत्री छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार व अन्य नेत्यांशी चर्चा करून ओबीसी आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

- काय म्हणाले फडणवीस

- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार.

- उद्धव ठाकरे ज्येष्ठ आहेत. मित्रांनो. त्यांच्याबद्दल आदर आहे. आशा आहे की, ते व्यावहारिक होतील.

- राज्यातील पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनावर भर.

-ऑपरेशन लोटस करण्यात आले नाही. फक्त मदत केली.

- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक. त्यांच्या पत्राला उत्तर देण्यासाठी शब्द नाहीत. त्यांना लवकरच भेटू.

- सरकार भ्रष्ट आहे, याचा अर्थ सर्व मंत्री चुकीचे आहेत असे नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस