शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अबब! बुटात आढळला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 09:39 IST

सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला.

ठळक मुद्देखापरखेडा येथील प्रकारशेपटी दिसल्याने अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला आणि काही वेळाने दडलेला साप बुटातून बाहेर आला. हा प्रकार नागपूर तालुक्यातील खापरखेडा येथील प्रकाशनगर कॉलनीत नुकताच घडला.सुमित सुधीर धार्मिक हा नागपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये शिकत असून, प्रकाशनगर कॉलनीत तिसऱ्या माळ्यावर आई-वडिलांसोबत राहतो. सोमवारी सकाळी आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याने आवराआवर केली आणि बूट घालण्यासाठी दाराजवळ गेला. त्याचवेळी त्याला बुटात शेपटी दिसली. त्याने न घाबरता बूट हळूच फरशीवर ठेवला व वडिलांना माहिती दिली. वडिलांना विश्वास बसला नाही. त्यांनी गंमत म्हणून बूटकडे निरखून बघितले.काही वेळातच साप बुटाबाहेर आला. शिवाय, शेजाºयांनी साप पाहण्यासाठी गर्दी केली होती. सर्पमित्र दद्दू गणवीर यांनी लगेच सुमितचे घर गाठले आणि सापाला पकडून दूरवर सोडले. तो कवड्या जातीचा असून, बिनविषारी असल्याची माहिती गणवीर यांनी दिली.

टॅग्स :snakeसाप