शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

'मेरे मित्र नितीनजी, आप बोलते बहुत प्यारे हो, लेटर भी सख्त लिखते हो'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 15:01 IST

Nagpur News Nitin Gadkari जनतेच्या विकास कामात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धवे ठाकरे यांचे गडकरींना प्रतिउत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाच्या मार्गात स्पीड ब्रेकर येऊ देणार नाही. माझा स्वभाव शिस्तीचा असून जलद गतीने प्रवास व विकास व्हावा, यावर नेहमीच भर असतो. माझे मित्र नितीनजी, ‘आप बोलते बहुत प्यारे हो, पर लेटर भी सक्त लिखते हो’. कर्तव्य कठोर आहे. ते लिहावेच लागेल. तुम्हा-आम्हाला बाळासाहेबांची शिकवण मिळाली आहे. जनतेच्या विकास कामात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे दिली. ('My friend Nitinji, you are very lovely in speaking, you also write strong letters')

महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत झिरो माईल व कस्तुरचंद पार्क स्टेशन आणि मार्ग व फ्रीडम पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे झाले. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली.नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम महामार्गाच्या कामात शिवसैनिक अडथळे आणत असून ते वसुलीसाठी कंत्राटदारांची उपकरणे व साहित्य जाळतात. शिवसैनिकांमुळेच महामार्गाच्या कामाला उशीर होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते.

या पत्राची चर्चा संपूर्ण राज्यात ‘लेटरबॉम्ब’ म्हणून झाली होती. या लेटरबॉम्बवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर न देता शिवसैनिकांनी तंबी दिली होती. शुक्रवारच्या कार्यक्रमात दोन्ही नेते हजर असल्याने मुख्यमंत्री लेटरबॉम्बला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी ‘माझे मित्र नितीनजी’ असा उल्लेख करीत लेटरबॉम्बला उत्तर दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, जनतेच्या विकास कामांच्या आड कुणीलाही येऊ देणार नाही. तो अधिकार जनतेचा आहे. जनतेच्या आशीर्वादाने सर्वजण मोठे होतात. आशीर्वाद मोठा असतो. तो जन्मात फेडता येणार नाही. नितीनजी आश्वस्त राहा, विकास कामे होतील.प्रारंभी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. विकास कामांमुळेच महाराष्ट्र बदलत आहे. भव्य प्रकल्पांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे. ठाणे आणि मुंबईच्या विकास कामांसाठी १ लाख कोटी रुपये देऊ, अशी ग्वाही गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे