शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल प्रसिद्धी ठीक; पण परिश्रमाशिवाय पर्याय नाही : निखिल पाॅल जाॅर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 11:11 IST

साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी पाॅल जाॅर्जने व्यक्त केली.

ठळक मुद्देनागपूरकर निखिलचा व्हॅलेंटाईन स्पेशल म्युझिक अल्बम प्रदर्शित

नागपूर :संगीत नियाेजक म्हणून आता बाॅलिवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरावत असलेल्या नागपूरच्या निखिल पाॅल जाॅर्जचा नवीन म्युझिक अल्बम ‘दिलाें की नजदीकियां’ प्रसिद्ध झाला. व्हॅलेंटाईन गीत, संगीतामुळे तरुणांना ताे आवडेल, अशी आशा निखिलने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या टीमने साेशल मीडियावर सक्रियता वाढविली आहे. साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

‘लाेकमत - महारक्तदान शिबिरा’चे थीम साॅंग कम्पाेज केलेल्या निखिलसह नागपूरची अभिनेत्री पलचिन व फाेटाेग्राफी डायरेक्टर स्वप्निल रे यांनी लाेकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ‘दिलाें की नजदीकियां’ हे गाणे तसे २०१४ मध्ये आलेल्या अभिनेता शाहीद कपूर व आलिया भटच्या चित्रपटातील आहे, जे स्वत: निखिलनेच गायले आहे. मात्र नव्या अल्बममध्ये हे गाणे निखिल व पलचिन यांच्यावर चित्रित केले आहे. आणखी एक विशेषत: म्हणजे अल्बमचे संगीत संयाेजन, फाेटाेग्राफी अशा सर्व तांत्रिक बाजू नागपूरच्याच कलावंतांनी सांभाळल्या आहेत. नागपूरमध्ये अमर्याद टॅलेन्ट आहे आणि त्यांना संधी मिळेल असे प्राेजेक्ट पुढेही तयार करण्याची इच्छा निखिलने व्यक्त केली.

निखिलने ‘बर्फी’, ‘शानदार’ अशा चित्रपटांमध्ये गाणे गायले आहे. मात्र संगीत संयाेजक म्हणून ‘ऐ दिल है मुश्किल, दंगल, ये जवानी है दिवानी’ अशा चित्रपटांत काम केले आहे. पुढेही अनेक चित्रपट येऊ घातले आहेत, ज्यात ताे संगीत कम्पाेजर आणि गायक म्हणूनही स्थिरावताे आहे. बाॅलिवूडमध्ये संगीत क्षेत्रात नागपूरचे अनेक कलावंत आहेत व नागपूरकर म्हणून याचा अभिमान असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

नागपूर टू बाॅलिवूड व्हाया लंडन

निखिल संगीत क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेला हाेता. यामधूनच हळूहळू त्याची ओळख निर्माण हाेत हाेती. अशात प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांचा फाेन आला आणि आपल्यासाेबत काम करण्यास सांगितले. यामधूनच त्याचा बाॅलिवूडचा प्रवास सुरू झाला. ‘बर्फी’ चित्रपटात साईड गायक म्हणून गाणे गाण्याची संधी मिळाली; पण दिग्दर्शक अनुराग बसू यांना त्याचाच आवाज आवडला आणि पूर्ण गाणे त्याचे झाले. आता गायक म्हणूनही त्याची ओळख निर्माण हाेत आहे.

टॅग्स :musicसंगीतSocialसामाजिक