शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

सोनेगावात तरुणाची हत्या

By admin | Updated: July 30, 2016 02:20 IST

आपली चुगली करीत असल्याच्या संशयावरून वाद घालून गुरुवारी रात्री एका गुन्हेगाराने एका तरुणाची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली.

नागपूर : आपली चुगली करीत असल्याच्या संशयावरून वाद घालून गुरुवारी रात्री एका गुन्हेगाराने एका तरुणाची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली. विक्रम शामराव पाटील (वय ४२) असे मृताचे नाव आहे. तो पेंटिंग काम करायचा. आरोपीचे नाव रणधीरसिंग श्यामबहादूरसिंग (वय ३६) असून तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगरात या दोघांचेही घर आहे. आरोपी रणधीर गुन्हेगारी वृत्तीचा असून, चोरी, लुटमारीच्या गुन्ह्यात नाव आल्याने परिसरात तो बदनाम आहे. त्याचे वडील खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सीआरपीएफची सध्या भरती सुरू आहे. त्यामुळे येथे बाहेरगावच्या तरुणांची, यांच्या नातेवाईकांची वर्दळ आहे. एका रात्रीचा मुक्काम अन् तयार होण्यासाठी या भागातील काही जण ५० ते १०० रुपये घेतात. विक्रम आणि रणधीर हे दोघेही असेच करायचे. रणधीरकडे थांबलेल्या अनेकांचे किमती साहित्य चोरीला गेल्याची चर्चा आहे. दणकट शरीरयष्टीचा रणधीर धाक दाखवून गप्प करीत असल्याने त्याच्याविरोधात कुणी तक्रार द्यायला धजावत नाही. मात्र, त्याच्यापासून बहुतांश जण सावध राहण्याची बाहेरच्या तरुणांना सूचना करतात. गुरुवारी सायंकाळी असेच झाले. विक्रमजवळ आलेल्या काही तरुणांनी तात्पुरत्या मुक्कामासंदर्भात चौकशी केली. विक्रमने आपल्याकडे जागा नाही. मात्र, जेथे कुठे राहाल, चौकसपणे मुक्काम करा कारण किमती चीजवस्तू चोरीला जात असल्याचे त्यांना सांगितले. बाजूला असलेल्या रणधीरने हे ऐकले. त्यानंतर तो थेट विक्रमच्या अंगावर चालून आला. विक्रमची कोणतीही बाब ऐकून न घेता त्याला ठोसे लगावून खाली पाडले. त्यानंतर लाथा मारल्या. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही. तर, कपडे आपटावे, तसे उचलून तो विक्रमला जमिनीवर पटकू लागला. (प्रतिनिधी) कुणीच धावले नाही मदतीला अर्धमेल्या अवस्थेत सोडून आरोपी पळून गेला. ज्या तरुणांना विक्रमने सतर्क केले. त्यांच्यासह अनेक नागरिक ही अमानुष मारहाण बघत होते. मात्र, कुणीही विक्रमच्या मदतीला धावण्याचे धाडस दाखविले नाही. फोनवरून माहिती मिळाल्यानंतर सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी विक्रमला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपी तासाभरातच गजाआड घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी रणधीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि धावपळ करीत तासाभरातच आरोपीला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त सुहास वारके, उपायुक्त दीपाली मासिरकर, सहायक आयुक्त शेखर तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक बागुल, द्वितीय निरीक्षक काळे, सहायक निरीक्षक पाटील, नितीन पगारे, उपनिरीक्षक मेश्राम, नप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.