शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडांनी केली तरुण कंत्राटदाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:40 IST

कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली.

ठळक मुद्देगँगस्टरचा भाचा सूत्रधारअवैध सावकारी, पैशाच्या वसुलीतून अपहरणआठ दिवसानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंडांनी अवैध सावकारीतून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुण कंत्राटदाराची निर्घृण हत्या केली. एक आठवड्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. श्रीकांत हरिभाऊ वंजारी (वय ३१) असे मृताचे नाव असून, आरोपींची नावे शैलेष केदारे आणि आकाश उर्फ विक्की भोसले अशी आहे. केदारे हा गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा होय.हुडकेश्वर हद्यीत नरसाळा मार्गावर दुर्गेश नंदिनी नगर आहे. तेथे श्रीकांत राहत होता. तो बांधकाम तसेच इलेक्ट्रीकच्या कामाचे कंत्राट घ्यायचा. ८ मे च्या सकाळी ९.३० वाजता श्रीकांतने आपल्या आईकडे छाती दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्याच्या भावाने श्रीकांतच्या छातीला बाम चोळून दिला आणि तो तसेच त्याची आई घराबाहेर गेले. काही वेळेनंतर ते घरी परतले असता त्यांना श्रीकांत पलंगाखाली पडून दिसला. त्यांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी श्रीकांत वंजारीला मृत घोषित केले. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, डॉक्टरांनी पोलिसांना शवविच्छेदन अहवाल दिल्यानंतर पोलीस चक्रावले. श्रीकांत वंजारीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्या असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले होते. त्यामुळे पोलिसांनी चौकशीची चक्र फिरवली. श्रीकांतने काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शैलेष केदारे (रा. इतवारी) आणि आकाश उर्फ विक्की भोसले यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही आरोपींनी त्याच्यामागे आणखी रक्कम पाहिजे म्हणून तगादा लावला होता. रक्कम परत करण्यास उशिर होत असल्यामुळे केदारे आणि भोसले आपल्या टोळीतील ४ ते ५ गुंडांसह ५ मे च्या दुपारी ३.३० वाजता श्रीकांतच्या घरात शिरले. त्यांनी श्रीकांतला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसविले आणि त्याचे अपहरण करून त्याला अज्ञातस्थळी नेले. तेथे श्रीकांतला आरोपींनी चाकू, लोखंडी रॉड तसेच बिअरच्या बाटलीने तब्बल दोन तास मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला आरोपींनी सायंकाळी ५.२५ ला घराजवळ सोडून पळ काढला. गंभीर दुखापतीमुळेच ८ मे च्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.

टॅग्स :Murderखून