शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 23:33 IST

पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपी पतीस साटक (ता. पारशिवनी) परिसरात सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.

ठळक मुद्देकुरहाडीने केले वार : रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपी पतीस साटक (ता. पारशिवनी) परिसरात सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.पुष्पा महेश खंडाते (३०) असे मृत पत्नीचे नाव असून, महेश रूपचंद खंडाते (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. खंडाते दाम्पत्य मूळचे जुगारा (टोला), जिल्हा सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ते काही वर्षांपूर्वी रामटेक तालुक्यात कामाच्या शोधात आले होते. ते कैलास ठाकरे, रा. नवरगाव यांच्या शेतातील घरात तीन महिन्यांपासून वास्तव्याला होते. शिवाय, महेश त्यांच्याकडेच शेतीची कामे करायचा. त्यांना दीड वर्षाचा मुलगादेखील आहे.त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडणे व्हायची. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात महेशने पुष्पावर कुºहाडीने वार करून तिची हत्या केली आणि लगेच पळून गेला. पुष्पाची हत्या करण्यात आल्याची बाब महेशची आई कलाबाई हिच्या सोमवारी सकाळी लक्षात आली. तिने ही बाब कैलास ठाकरे यांना सांगितली. ठाकरे यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत ठाकरे करीत आहेत.आरोपी पतीस अटकपुष्पाची हत्या केल्यानंतर महेश घटनास्थळाहून पळून गेला होता. पोलिसांनी घटनास्थळाहून काही साहित्यही जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी महेशबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष व इतर पोलीस ठाण्याला कळविली होती. तो साटक (ता. पारशिवनी) गावाच्या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली. महेशच्या वडिलांचा त्याच्या बालपणीच मृत्यू झाल्याने त्याचा सांभाळ आई कलाबाईनेच केला.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर