शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:15 IST

निर्जन ठिकाणी नेऊन एका अनोळखी तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पारडी परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देपारडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्जन ठिकाणी नेऊन एका अनोळखी तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पारडी परिसरात एकच खळबळ उडाली.भंडारा मार्गावरील कापसी पुलाजवळच्या मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पारडी पोलिसांना गुरुवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास मिळाली. त्यावरून ठाणेदार सुनील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रियांका गोदमले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मृत तरुणाच्या डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचले होते आणि बाजूलाच रक्ताने भरलेली सिमेंटची वीट पडून होती. त्यामुळे त्या विटेने ठेचून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. तरुणाच्या कपड्याची तपासणी केली असता त्याची ओळख पटविणारे कोणतेही कागदपत्र पोलिसांना मिळाले नाही. बाजूला देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडून होत्या. त्यामुळे मृत आणि त्याला मारणारे आरोपी तेथे बसून दारू प्यायले असावे. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यामुळे त्यांनी या तरुणाची हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. याप्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मृताची ओळख पटविण्याचा तसेच त्याची हत्या कुणी केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.अत्याचाराचा प्रयत्न?मृत तरुणाचा पँट गुडघ्यापर्यंत खाली होता. त्यामुळे त्याच्यासोबत आरोपींकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असावा, अशी चर्चा अन् संशय आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर