शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वृद्ध दांपत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 10:19 IST

घरी आराम करीत असलेल्या वृद्ध पती व पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना वाडी शहरातील सुरक्षानगरात रविवारी रात्री उघडकीस आली.

ठळक मुद्देडोक्यावर रॉडने वार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: घरी आराम करीत असलेल्या वृद्ध पती व पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना वाडी शहरातील सुरक्षानगरात रविवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे; शिवाय त्यांचे कुणाशीही शत्रुत्व नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.शंकर चक्रवर्ती (७०) व सीमा चक्रवर्ती (६०), रा. सुरक्षानगर, वाडी अशी मृत पती व पत्नीची नावे आहेत. त्यांना प्रियंका (२५) नावाची एकुलती मुलगी असून, ती खासगी कंपनीमध्ये नोकरी करते. शंकर दत्तवाडी येथील चौकात नारळपाणी विकण्याचा धंदा करून उपजीविका करतात. प्रियंका त्यात हातभार लावायची. ती रविवारी सकाळी खरेदीला गेली होती. त्यामुळे रात्री शंकर व सीमा दोघेच घरी होते. ती रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी परतल्यावर तिला तिचे आई व वडील रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले.तिने लगेच पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, पोलीस उपायुक्त विवेक मिसाळ व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्या दोघांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याचे तसेच त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यांचे कुणाशीही शत्रुत्व नसल्याने त्यांचा खून का करण्यात आला, हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.ते प्रकरण अदखलपात्रच्काही दिवसांपूर्वी शंकर यांचा अपघात झाल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे ते घरीच राहायचे. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद न करता ते ‘एनसी’ (अदखलपात्र गुन्हा) नोंद करून प्रकरण तपासात घेतले नाही. कदाचित त्याच प्रकरणातून या दोघांचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Murderखून