शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला झापड मारणाऱ्या ट्रकचालकाची हत्या; चार आरोपींना अटक

By योगेश पांडे | Updated: December 19, 2023 21:16 IST

कळमना बाजारपेठेत खळबळ

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शिवीगाळ केल्याच्या संशयावरून तरुणाला झापड मारणाऱ्या ट्रकचालकाची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री कळमना मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

शिवराज श्रीचंद्र (२९, कौसंबी, उत्तरप्रदेश) असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे. तर मंडला येथील पंकज मन्सराम आहेरवार (२५), संजय सूर्यप्रकाश उईके (१८), पाटणसावंगीतील अभिजीत हेतराम तुरकर (२५) व शेख फारूख शेख हुसेन (३६, सिंधीबन, सक्करदरा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीदेखील ट्रकचालक आहेत. ते कळमना मार्केटमध्ये मालाची ने-आण करतात. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळमना मार्केटच्या प्रवेशद्वारासमोर पंकज हा त्याच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत होता. तर शिवराज जवळच उभा होता. तो दारूच्या नशेत होता व पंकजने त्यालाच शिवीगाळ केल्याचा संशय आला. तो पंकजजवळ गेला वाद घालू लागला. त्याने पंकजच्या कानशिलात लगावली. ही बाब पंकजने त्याच्या मित्रांना सांगितली. पंकज आणि त्याच्या साथीदारांनी शिवराजवर हल्ला केला. आरोपींनी शिवराजच्या डोक्यात शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. त्याचे दोन मित्रही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवराजला दवाखान्यात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी