शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या; आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 22:54 IST

Nagpur News एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे घडली आहे.

ठळक मुद्देचाकूने गळा व पाेटावर केले वार

नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनी ट्यूशन क्लास आटाेपून घरी परत येत असताना तरुणाने तिला बळजबरीने माेटरसायकलवर बसवून साळवा (कुही) शिवारातील जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर रागाच्या भरात गळा व पाेटावर चाकूने वार करून तिची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २१) घडली असून, बुधवारी (दि. २२) उघडकीस आल्याने पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.

धीरज सुरेश शेंडे (१९, रा. भामेवाडा, ता. माैदा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मृत विद्यार्थिनी ही १५ वर्षीय असून, ती शिवाजीनगर, माैदा येथील रहिवासी आहे. ती माैदा शहरातील जनता हायस्कूलमध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिकायची. ती मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास ट्यूशनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली हाेती. सकाळी ११ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने आई वडिलांनी तिची मैत्रिणींकडे चाैकशीही केली.

दरम्यान, ती क्लास आटाेपून धीरज शेंडेसाेबत माेटरसायकलवर गेल्याची माहिती काही मुलींनी तिच्या आईवडिलांनी दिली. ती रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास माैदा शहरातील शिवाजीनगर भागातून धीरजला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यानंतर त्याने रात्री तिचा खून केल्याची माहिती पाेिलसांना देताच त्याला अटक केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३६३, ३०२, २०१, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.प्रेमसंबंध असल्याचा संशयतिचे दुसऱ्या मुलासाेबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याची माहिती आराेपी धीरजने पाेलिसांना दिली. याच संशयापाेटी त्याने तिला बळजबरीने माेटरसायकलवर बसून साळवा शिवारातील जंगलात नेले. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर भांडण करीत चाकूने वार करून तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धीरजने तिचा मृतदेह जंगलात फेकून देत गावाच्या दिशेने पळ काढला हाेता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी