शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

दोन नगरसेवकांसह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा

By admin | Updated: June 23, 2014 01:14 IST

माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा ऊर्फ हब्बू (४८) यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी माजी उपमहापौर तथा

एका आरोपीला अटक : माजी मिनी महापौरांच्या पतीची हत्याप्रकरणअमरावती : माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा ऊर्फ हब्बू (४८) यांच्यावर सशस्त्र हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी माजी उपमहापौर तथा नगरसेवक शेख जफर शेख जब्बार (४०,रा. नमुना), नगरसेवक अब्दुल रफीक ऊर्फ रफ्फु पत्रकार (रा.हैदरपुरा) यांच्यासह नऊ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन शहाबाज हुसेन बशीर हुसेन (३५, रा. आझादनगर ) या आरोपीला अटक केली आहे.हबीब शहा हत्याप्रकरणी पोलिसांनी माजी उपमहापौर तथा नगरसेवक शेख जफर शेख जब्बार, नगरसेवक अब्दुल रफीक ऊर्फ रफ्फु तसेच आसीफ काल्या, हब्बु बनजोटा, लच्छु, अकील भंगारवाला, नईम, शाकीर हुसेन, शहाबाज हुसेन या नऊ जणांविरुध्द नागपुरी गेट पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२५ आर्म्स अ‍ॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. यातील शहाबाज हुसेन याला अटक करण्यात आली. या हल्लेखोरांनी जुन्या वैमनस्यातून हबीब शहा यांच्यावर सशस्त्र हल्ला चढवून हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ रशीद शहा यांनी पोलिसात दाखल केली होती. प्रभाग क्र. ३० च्या नगरसेविका तथा माजी मिनी महापौर (झोन सभापती) फैमिदा नसरीन यांचे पती हबीब शहा हे शनिवारी त्यांच्या घरासमोर खुर्च्या टाकून बसले होते. तेथे सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सात ते आठ हल्लेखोर आले व त्यांनी हबीब शहा यांच्यावर चाकू व तलवारीने हल्ला केला. हबीब शहा यांच्यावर हल्ला होत असताना त्यांचा भाऊ रशीद शहा बशीर शहा (३०) व भाचा जावेद शहा (२५, दोन्ही रा. नुरानी चौक) या दोघांनी त्यांच्या बचावासाठी मध्यस्ती केली. परंतु हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान हबीब शहा यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)