शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

२४ तासांपूर्वी मार खाल्ला अन् जीव घेऊन बदला चुकविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 21:06 IST

Nagpur News दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर दोघांनी त्यांच्यासोबत दारू पीत बसलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४.१५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - २४ तासांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला चुकविण्यासाठी दोघांनी एका गुन्हेगाराची चाकूने भोसकून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४.१५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. आकाश मातादीन मोरे (वय २२) असे मृताचे नाव आहे.

तो आरटीओ कार्यालयाजवळ (डिप्टी सिग्नल परिसर) आदिवासी प्रकाशनगरात राहत होता. गुन्हेगारी वृत्तीच्या आकाशचे स्वताच्या आईसोबतही पटत नव्हते. त्याला सर्वच प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन होते. नशेत तो कुणालाही मारहाण करायचा. याच वस्तीतील आरोपी विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुरसिंग लहरी उर्फ देशमुख या दोघांसोबत मंगळवारी आकाशचा वाद झाला होता. यावेळी आकाशने नागेंद्र आणि लहरीला कंबरपट्ट्याने (बेल्टने) बेदम मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेल्या अपमाणामुळे आरोपींनी आकाशला गंभीर परिणामाची धमकीही दिली होती. दरम्यान, नेहमीप्रमाणे आकाश त्याच्या काही साथीदारासह कळमना उड्डाणपुलाखाली जुगार खेळत बसला. यावेळी तो नशेत होता. दुपारी ४.१५ च्या सुमारास मागून नागेंद्र आणि लहरी आले. त्यांनी आकाश याच्यावर चाकूहल्ला चढवला. त्यानंतर बाजुच्या पटरीवरून ते पळून गेले. दरम्यान, तेथे जुगार खेळत बसलेली तसेच आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. आकाशला त्यांनी मेयोत नेले तेथे काही वेळेतच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर आदिवासीनगरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि आरोपींची शोधाशोध सुरू होती.

उपचारात झाला विलंबआरोपींनी आकाशला चाकूने भोसकल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्याऐवजी आजूबाजूची मंडळी बराच वेळ नुसताच हो-हल्ला करीत राहिली. १५ ते २० मिनिट निघून गेल्याने आकाशचा बराच रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याचा अखेर मृत्यू झाला.लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

विशेष म्हणजे, आकाशची हत्या करण्यापूर्वी आरोपी विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुरसिंग लहरी उर्फ देशमुख यांनी नायट्रो-१० या नशा आणणाऱ्या गोळ्या खाल्ल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, रविवारी २६ सप्टेंबरच्या अंकात लोकमतने नागपुरातील गुन्हेगार हत्या करण्यापूर्वी ‘नायट्रो १०’ ची नशा करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या प्रकरणातून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी