शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दारूच्या नशेत आरोपीकडून सहकाऱ्याची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:32 IST

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या आरोपीने आपल्याच सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देमृत आणि आरोपी बिहारचे रहिवासी : यशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या आरोपीने आपल्याच सहकाऱ्याची निर्घृण हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. मोहम्मद जुबेर (वय अंदाजे ४५ वर्षे) असे मृताचे नाव आहे.जुबेर बिहार प्रांतातील दरभंगा जिल्ह्यात राघोपूर येथील रहिवासी होय. या गावात कपड्यावर कलाकुसर करणारांची मोठी संख्या आहे. तेथून रोजगाराच्या शोधात आलेले अनेक जण नागपुरात स्थिरावले आहेत. आरोपी मोहम्मद आलमगिर मोहम्मद दिसा शेख (वय ३०) आणि मोहम्मद जुबेर सहा महिन्यांपूर्वी नागपुरात आले. प्रारंभी जुबेर आजरी माजरी परिसरात एका व्यापाऱ्याकडे कपड्यावर कलाकुसर करायचा. दोन आठवड्यांपूर्वी त्याचे तेथून काम सुटले. त्यामुळे गावातील अन्य कारागिरांच्या ओळखीने तो यशोधरानगरातील निजामुद्दीन कॉलनीत राहायला आला. आरोपी आलमगिर आणि जुबेर हे मोहम्मद आलम मोहम्मद इस्लाम शहा (वय ३४) यांच्याकडे भाड्याने राहायचे. दोघांनाही दारूचे व्यसन होते. रोज दारू पिऊन रात्रीचे जेवण घेतल्यानंतर जुबेर गावातील ओळखीच्यांकडे बाजूला झोपायला जायचा. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ११ च्या सुमारास जुबेर बाजूच्या व्यक्तीकडे गेला. तेथे आरोपी आलमगिरही आला. दारूच्या नशेत तेथे दोघांत वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यावेळी आरोपी आलमगिरने टोकदार शस्त्राने जुबेरच्या छातीवर घाव घातले आणि पळून गेला. जखमी अवस्थेत जुबेर घरासमोर उभा असताना घरमालक मोहम्मद आलम बाहेरून आले. त्याच्या छातीतून रक्त निघत असल्याचे पाहून आलम यांनी त्याला विचारणा केली. यावेळी आलमगिरने मारल्याचे सांगून जुबेर खाली कोसळला. आलम यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी जुबेरला मृत घोषित केले.पोलिसांसोबत लपंडावआरोपी आलमगिर हा गुन्हेगारी वृत्तीचा असून तो रविवारी रात्रीपासून पोलिसांसोबत लपंडाव खेळत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी गेल्यानंतर तो काही वेळेसाठी आपला मोबाईल बंद करून ठेवतो. त्याचे लास्ट लोकेशन पाहून पोलीस ज्या ठिकाणी पोहचतात, तेथून तो कधीचाच सटकलेला असतो. पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आरोपी पोलिसांना सापडला नव्हता.---

टॅग्स :nagpurनागपूरMurderखून