शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

By admin | Updated: March 4, 2016 02:55 IST

घरासमोरच्या मैदानात आपल्या मैत्रिणीसोबत दहावीच्या पेपरची चर्चा करीत बसलेल्या एका विद्यार्थ्याला गुंडांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.

गुंडांकडून बेदम मारहाण ४ तिघांना अटक ४ पोलिसांची बेफिकिरी भोवलीनागपूर : घरासमोरच्या मैदानात आपल्या मैत्रिणीसोबत दहावीच्या पेपरची चर्चा करीत बसलेल्या एका विद्यार्थ्याला गुंडांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. गड्डीगोदाम भागातील गौतमनगरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. रोशन राजू धोंगडे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चंदू मस्ते, पीयूष घोडेस्वार आणि सोनू सावकर या तिघांना अटक केली तर मिथून मस्ते फरार आहे. विशेष म्हणजे, कुख्यात मस्ते आणि साथीदारांची सदर पोलिसांना माहिती आहे. मात्र, हप्ताखोर पोलिसांनी त्यांच्या गुंडगिरीकडे दुर्लक्ष केल्याने ही संतापजनक घटना घडली.रोशन मोहन नगरातील सेंट मायकल स्कूलचा दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्या घरची स्थिती जेमतेम आहे. त्याचे वडील खासगी सुरक्षा रक्षक असून आई गृहिणी आहे. आरोपी चंदू आणि मिथून मस्ते गौतमनगरात कुख्यात आहे. ते दारू, जुगारात गुंतले आहेत. बुधवारी सायंकाळी रोशन आपल्या एका मैत्रिणीसोबत रेल्वेपटरीच्या मैदानाजवळ गप्पा करीत होता. त्यावेळी तेथे चंदू आणि मिथून आपल्या साथीदारांसह आले. आमच्या घरासमोर कशाला बसला असे म्हणत आरोपींनी रोशनला मारहाण केली. रोशन आणि त्याच्या मैत्रिणीने हात पाय जोडत आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. मात्र, या नराधमांनी कोवळ्या रोशनच्या पोटावर, कोथ्यावर लाथाबुक्क्या मारून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत रोशनला मेयोत नेण्यात आले. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मात्र, मस्तेच्या जुगार अड्ड्यावरून देवघेव करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला. लोकभावना तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चंदू मस्ते, पीयूष घोडेस्वार आणि सोनू सावकर या तिघांना अटक केली तर मिथून मस्ते फरार आहे. (प्रतिनिधी)रोशनने वडिलांना सांगितले होतेमस्ते बंधूंची गुंडगिरी आणि मस्तवालपणा गौतमनगरात सर्वांना माहीत आहे. त्यांच्या धाकामुळे कुणी बोलायला तयार नाही. या भागातील दर्गाहजवळ बसणाऱ्या प्रेमी युगुलांसोबत मस्ते आणि त्यांचे गुंड साथीदार नको ते वर्तन करतात. रोशनला यापूर्वीही त्यांनी धाक दिला होता. वडिलांना रोशनने माहिती दिली होती. वडील राजू धोंगडे यांनी ‘त्यांना आज मी समजावून सांगेन‘ असे बोलून राजू यांनी रोशनची समजूत काढली होती.