शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घरात घुसून हत्या; शेजाऱ्यांशी वाद भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 16:46 IST

Crime Murder Nagpur news शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला. अशोक संतराम नहारकर (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीची नावे मुन्ना महातो, रामू ऊर्फ चुन्नी महातो आणि चेतन महातो आहेत. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.मृत अशोक नहारकर आणि आरोपी मुन्ना हे एकमेकाच्या शेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर, आरोपी मुन्ना, चुन्नी आणि चेतन महातो हे तिघे रविवारी रात्री १० च्या सुमारास दिनेश संतराम नहारकर यांच्या घरावर चालून गेले. त्यांनी दिनेशला अश्लील शिवीगाळ केली. तेरा भतिजा इतना बडा बदमाश हो गया क्या, असे म्हणून ते मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करू लागले. दिनेशने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला बेदम मारहाण केली. वाद वाढू नये म्हणून दिनेश आपल्या घरात गेले आणि त्यांच्या घरच्यांनी आतून दार लावून घेतले.

आरोपींनी त्यांच्या दारावर लाथा मारून दार तोडले आणि आत गेले. आरोपी घरात तोडफोड करत असल्याचे पाहून दिनेश यांचे मोठे भाऊ अशोक नहारकर यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी जवळचा चाकू काढून अशोक यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर घाव घातले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही आरोपी इतरांना धमकावत होते. आजूबाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी बाहेर निघाले. माहिती कळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले.

टॅग्स :Murderखून