शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोनाचे नमुने घेण्यासाठी आलेल्या ‘मुन्नाभाई’ला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 10:15 IST

Nagpur News मेडिकलमध्ये मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर सांगत, कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आलेला तोतया डॉक्टर ‘मुन्नाभाई’ला ‘कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर’ने (सीएमओ) पकडल्याने गुरुवारी खळबळ उडाली.

ठळक मुद्देचांगल्या उपचाराची हमी देऊन गरजू रुग्णांकडून उकळत होता पैसे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलमध्ये मेडिसीन विभागाचा निवासी डॉक्टर सांगत, कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी आलेला तोतया डॉक्टर ‘मुन्नाभाई’ला ‘कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर’ने (सीएमओ) पकडल्याने गुरुवारी खळबळ उडाली. हा तोतया डॉक्टर कधी मेडिसीनमध्ये, तर कधी ऑर्थाेपेडिक विभागात निवासी डॉक्टर असल्याचे सांगून दुसऱ्या विभागातील डॉक्टरांना विशिष्ट रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचा सल्ला देत रुग्णांकडून पैसे उकळत होता.

प्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थ जैन या नावाची प्लेट ॲप्रनवर लावून कॅज्युअल्टीच्या बाहेर उभा राहून गरीब व गरजू रुग्णांना तो हेरत होता. चांगल्या उपचाराची हमी देत त्यांच्याकडून पाच ते दहा हजार रुपये घेत होता. ॲप्रन घातलेला व गळ्यात स्टेथेस्कोप लटकवून असलेल्या या डॉक्टरला पाहून काही रुग्ण विश्वास ठेवून पैसेही देत होते. तो त्या रुग्णासोबत कॅज्युअल्टीमध्ये किंवा वॉर्डात जाऊन तेथील निवासी डॉक्टरांना संबंधित रुग्णाकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना करीत होता. मात्र, नंतर तो गायब होत असल्याने याविषयी मेडिकल प्रशासनाकडे काही रुग्णांच्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे सुरक्षा रक्षक व ‘सीएमओ’ सतर्क होते. गुरुवारी सकाळी मेडिकलच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात संशयित कोरोना रुग्णाचे नमुने घेण्यासाठी आलेल्या एका अनोळखी डॉक्टरवर ‘सीएमओ’चे लक्ष गेले. त्याची विचारपूस केल्यावर त्याने निवासी डॉक्टर असल्याचे सांगितले. परंतु त्याच्या हालचालींवर संशय येताच ‘सीएमओ’नी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. लागलीच त्याला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पकडले. त्यानंतरही स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगून, एम्स दिल्ली येथून एमबीबीएसची पदवी घेतल्याचे त्याने सांगितले. मेडिकल प्रशासनाने अधिक तपासासाठी त्याला अजनी पोलीस ठाण्याच्या हवाली केले आहे. यापूर्वीही मेडिकलमध्ये ॲप्रन घालून वॉर्डात फिरत असलेल्या अशाच तोतया डॉक्टरला पकडले होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी