शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुनिश्वर समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:43 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश्वर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. बैठकीचे कार्यवृत्त कुलगुरूंना न मिळाल्यामुळे अद्याप समितीचे गठन झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देब्लेझर, ट्रॅकसूट घोटाळा : तीन सदस्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या ब्लेझर, ट्रॅकसूट व कीटच्या खरेदीत घोटाळा झाला आहे. विद्यापीठाच्या खरेदी समितीच्या बैठकीत ही बाब सिद्ध झाली. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विधीसभा सदस्य विजय मुनिश्वर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित करण्यात येणार आहे. बैठकीचे कार्यवृत्त कुलगुरूंना न मिळाल्यामुळे अद्याप समितीचे गठन झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी खरेदी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात येईल. जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. सोबतच खरेदी रद्द करण्यात येईल, असे आश्वसन कुलगुरूंनी दिली होते. यासंदर्भात चौकशी समितीचे गठन झाले नसले तरी अध्यक्षांचे नाव निश्चित केले आहे. विजय मुनिश्वर हे खेळाशी जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. सोबतच या समितीत शारीरिक शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.धनंजय वेळूकर यांचादेखील समावेश असेल.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठCorruptionभ्रष्टाचार