लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश उपलब्ध करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यात इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळा समितीच्या खात्यात गणवेशाचा निधी जमा केला जाणार आहे. कोविड-१९ संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता १ ली ८ वी च्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानातून गणेश देण्यात येतील. तर शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता ९ वी ते १२ व पूर्व प्राथमिक वर्गासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश पुरविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
मनपा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 01:26 IST
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मनपा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश
ठळक मुद्दे ६० लाखांच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी