नागपूर : सहायक पोलीस निरीक्षकास लाच मागणारा मनपाच्या कर निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. अशोक राहाटे (५७) असे या लाचखोर कर निरीक्षकाचे नाव आहे. अशोक राहाटे महापालिकेच्या मंगळवारी झोनमध्ये कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याकडे गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे पेन्शननगर, जाफरनगर, पोलीस लाईन टाकळी आदी परिसर येतात. तक्रारकर्ते अनिल घरजाले (५३) हे शहर पोलीस विभागात कार्यरत आहेत. गेल्या १६ जून रोजी अशोक राहाटे हे घरजाले यांच्या घरी आले. घरजाले यांच्या घरी पाच भाडेकरू असल्याचे सांगून त्यांच्याकडून दरवर्षी १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचा हवाला दिला, तसेच या उत्पन्नाच्या आधारावर ६० हजार रुपये वार्षिक कर भरण्यास सांगितले. ६० हजार रुपये वार्षिक कर भरायचा नसेल तर त्या मोबदल्यात ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे राहाटेने सांगितले. तसेच मंगळवारी झोन कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले. १७ जून रोजी घरजाले हे मंगळवारी झोन कार्यालयात जाऊन त्यांना भेटले तेव्हा त्यांनी २५ हजार रुपयाची लाच मागितली. घरजाले यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तपासणी केली असता राहाटे यांनी लाच मागितल्याचे दिसून आले. पोलिसांकडून लाच राहाटे २००१ पासून वॉर्ड ६१ मध्ये कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. या वॉर्डातील बहुतांश रहिवासी हे पोलीस अधिकारी-कर्मचारी आहेत लाच मागण्याच्या बाबतीत पोलीस तसेच बदनाम आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून लाच मागणे हे जोखमीचेच काम असते. परंतु राहाटे हे अनेक वर्षांपासून या कामात तरबेज होता. सेवानिवृत्तीला केवळ ५ महिने शिल्लक अशोक राहाटेच्या सेवानिवृत्तीला केवळ ५ महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली. पकडल्यानंतर एसीबीने त्यांच्या घराचीही झडती घेतली. त्यांना न्यायालयात सादर करून एक दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
मनपाचा कर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: July 2, 2015 03:11 IST